Dry Ginger Powder Benefits : ऋजुता दिवेकरकडून जाणून घ्या सुंठाचे फायदे व वापर करण्याची योग्य पद्धत

सेलिब्रिटी न्यु्ट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुंठाच्या सेवनाचे फायदे (Dry Ginger Powder Benefits) व याचा कशा पद्धतीने डाएटमध्ये समावेश करावा, हे सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Dry Ginger Powder Benefits
Dry Ginger Powder BenefitsSakal

Dry Ginger Powder Benefits : पावसाळा व हिवाळ्यामध्ये आरोग्य निरोगी राहावे, याकरिता आल्याच्या चहापासून ते कित्येक पौष्टिक पदार्थांचा समावेश केला जातो. काही जण आल्याऐवजी आहारात सुंठाचा समावेश करतात. सूंठ पावडर देखील आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. 

आहारात सुंठाचा कसा व अन्य कोणत्या पदार्थांसह वापर केला जाऊ शकतो आणि याद्वारे शरीराला कोणते फायदे मिळू शकतात. याबाबत सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने महत्त्वपूर्ण माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.   

Dry Ginger Powder Benefits
Ginger Peel : आल्याची साल फेकून देऊ नका, सालीपासून बनवा हे डिटॉक्स वॉटर

सुंठाचे सेवन केल्यास गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते. तसंच त्वचेच्या समस्या कमी होण्यास, अन्न सहजरित्या पचण्याकरिताही यातील औषधी गुणधर्मांमुळे फायदे मिळू शकतात. आहारात सुंठाचा वापर कसा करावा, जाणून घेऊया सविस्तर... 

Dry Ginger Powder Benefits
Benefits Of Ginger: सलग 30 दिवस करा आल्याचं सेवन, ‘हे’ आजार होतील दूर!

सुंठाचे सेवन करण्याचे फायदे (Dry Ginger Powder Benefits)

  • गुडघेदुखीची समस्या कमी होते

  • शारीरिक वेदना कमी होतात

  • पचनसंस्थेचं कार्य सुधारते

  • पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते

  • त्वचेसाठी फायदेशीर 

  • केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते

सुंठाचा आहारात कसा वापर करावा? (How To Consume Dry Ginger Powder)

  • दूध - रात्री दुधामध्ये सूंठ पावडर मिक्स करून आपण हे पेय पिऊ शकता. यामुळे झोप चांगली लागते. 

  • गूळ - दुपारच्या जेवणात गूळ- तुपामध्ये सूंठ पावडर मिक्स करून मिश्रण तयार करा. या मिश्रणाच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

Dry Ginger Powder Benefits
Ginger Pickle : सुखी वैवाहिक जीवनासाठी पुरुषांनी खाल्लेच पाहिजे आल्याचे लोणचे
  • तूप,गूळ आणि हळद - घरातील लहान बाळाला कफ, सर्दी आणि ताप येत असल्यास गूळ, तूप आणि हळद एकत्रित करा. या मिश्रणाचे लहान गोळ्या तयार करून त्यांना खायला देऊ शकता. 

  • मसाला चहा - तुम्हीही चहाप्रेमी असाल तर चहा तयार करताना त्यामध्ये सुंठाचा वापर करू शकता. हा चहा आरोग्याकरिता फायदेशीर ठरेल. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com