Osteoarthritis Physiotherapy : सांध्यांच्या वेदना कमी करतील हे व्यायामप्रकार

सांध्याभोवतालचे स्नायू ठरावीक वेळेनंतर कमकुवत होतात त्यामुळे स्नायूंना मजबूत करणे महत्त्वाचे आहे.
Osteoarthritis Physiotherapy
Osteoarthritis Physiotherapy google

मुंबई : ऑस्टियोआर्थरायटिस हा एक रोग आहे जो कूर्चा आणि सांध्यातील हाडांच्या र्‍हासामुळे तसेच हाडांच्या अतिवृद्धीमुळे उद्भवतो. याची लक्षणे आणि उपाय सांगत आहेत नेक्सस डे सर्जरी सेंटरच्या फिजिओथेरपिस्ट डॉ. रजनी सिंग.

लक्षणे कोणती ?

ऑस्टियोआर्थराइटिसची लक्षणे सहसा हळूहळू दिसून येतात आणि बहुतांश वेळा एक किंवा काही सांध्यापासून सुरू होतात. ऑस्टियोआर्थराइटिसच्या सामान्य लक्षणांमध्ये पुढील लक्षणे दिसून येतात. हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का ?

  • सांध्याची कोणतीही हालचाल करताना वेदना.

  • सकाळच्या वेळी सांधे आखडणे.

  • सांधे आणि आजूबाजूच्या भागावर सूज येणे, विशेषत: पुष्कळ क्रियाकलाप किंवा वारंवार वापर केल्यानंतर.

  • सांध्यामध्ये अस्थिरता जाणवणे.

Osteoarthritis Physiotherapy
Arthritis : मान, कंंबर, खांदे, गुडघे यांतील वेदनेमुळे येऊ शकतो heart attack

फिजिओथेरपीचे महत्त्व

१. वेदना आणि सूज यांचे व्यवस्थापन : शरीराच्या त्या भागामध्ये गरम/थंड शेक देणे आयएफटी, टीईएनएस सारख्या विद्युत पद्धतींचा वापर वेदना कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

२. सांध्याची लवचिकता आणि गतिशीलता सुधारणे : प्रभावित सांध्याच्या गतीची श्रेणी सुधारण्यासाठी स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम केल्यास अधिक मदत होते.

३. स्नायूंचे बळकटीकरण : सांध्याभोवतालचे स्नायू ठरावीक वेळेनंतर कमकुवत होतात त्यामुळे स्नायूंना मजबूत करणे महत्त्वाचे आहे.

४. स्नायुंचे संतुलन आणि समन्वय सुधारणे : स्नायूंच्या कमकुवतपणामुळे संतुलन समस्या उद्भवू शकतात परिणामी वारंवार पडणे आणि दुखापतही उद्भवू शकतात, म्हणून संतुलन आणि समन्वय प्रशिक्षण महत्वाचे आहे.

५. एकूण कार्यात्मक स्थिती राखणे.

Osteoarthritis Physiotherapy
Eyes Pain : डोळे सतत दुखत असतील तर ही आहेत त्यामागील कारणे

वेदना कमी करण्यासाठी साधे व्यायामप्रकार

१. पायाच्या घोट्याच्या हालचाली :

रुग्णाची स्थिती- पाठीवर सरळ झोपणे.

तुमचे घोटे तुमच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने हळूवार हलवा. ही क्रिया 10 वेळा करायची. असे दिवसातून तीन वेळा करा.

२. हील स्लाइड्स :

रुग्णाची स्थिती- पाठीवर सरळ झोपणे.

वेदना सहन करता येण्याइतपत गुडघा जितका वाकवता येईल तितका वाकवून पाय हळूहळू आपल्या दिशेने हलवा. ही क्रिया 10 वेळा आणि दिवसातून तीन वेळा करणे योग्य आहे.

३. स्थिर क्वाड्स :

रुग्णाची स्थिती- पाठीवर सरळ झोपणे

टॉवेल गुंडाळा आणि तो तुमच्या गुडघ्याच्या अगदी खाली ठेवा आणि हळू हळू खालच्या दिशेने दाबण्याचा प्रयत्न करा ही क्रिया 10 वेळा करावी. हा व्यायाम प्रकार दिवसातून तीन वेळा केल्यास अधिक फायदा होईल.

४. हॅमस्ट्रिंग कर्ल :

रुग्णाची स्थिती - पोटावर झोपणे.

वेदना सहन करण्याच्या श्रेणीमध्ये गुडघ्याला जास्तीत जास्त वळण मिळवण्यासाठी गुडघा वाकवून प्रभावित पाय हलवा आणि 10 अंक मोजेपर्यंत धरून ठेवा. ही क्रिया दिवसातून तीन वेळा करा.

५. डायनॅमिक क्वाड्रिसेप्स :

रुग्णाची स्थिती - पलंगाच्या काठावर अशा स्थितीत बसा की तुमचा गुडघा पलंगाच्या काठावर असेल.

हिप जॉइंटवर कोणतीही हालचाल न करता खालचा पाय वेदना सहन करण्याच्या श्रेणीत वरच्या दिशेने हलवा आणि 10 अंक मोजेपर्यंत धरून ठेवा. ही क्रिया दिवसातून तीन वेळा करा.

६. पोटऱ्या ताणणे :

रुग्णाची स्थिती - तुमचा गुडघा पूर्णपणे सरळ ठेवा एक टॉवेल घ्या आणि टॉवेलची दोन्ही टोके धरा, आता टॉवेलचा मध्यबिंदू पुढच्या पायाच्या भागात ठेवा आणि टॉवेलची दोन्ही टोके खेचून हळूहळू तुमच्या पोटऱ्यांचे स्नायू ताणा. 10 अंक मोजेपर्यंत धरून ठेवा.ही क्रिया दिवसातून दोन वेळा करा.

७. ब्रिजिंग :

रुग्णाची स्थिती- पाठीवर सरळ झोपा.

तुमचे दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून तुमच्या दिशेने हलवा, तुमच्या दोन्ही पायांमध्ये थोडी जागा ठेवा आणि वेदना सहन करण्याच्या श्रेणीत वरच्या दिशेने उचला.

10 अंक मोजेपर्यंत धरून ठेवा. ही क्रिया दिवसातून तीन वेळा करा.

८. हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग :

रुग्णाची स्थिती- पाठीवर सरळ झोपणे

टॉवेल/बँडचा वापर करून, तो तुमच्या पायावर ठेवा, टॉवेलची दोन्ही टोके धरा आणि गुडघा 50-60 अंश न वाकवता तुमचा पाय उचला आणि 10 अंक मोजेपर्यंत ही स्थिती कायम ठेवा.दिवसातून तीन वेळा ही क्रिया करा.

९. व्हीएमओचे बळकटीकरण :

रुग्णाची स्थिती - पाठीवर सरळ झोपणे.

तुमच्या गुडघ्याच्या अगदी खाली एक उशी ठेवा आता तुमचा पाय गुडघ्यापासून वर करा आणि 10 अंक मोजेपर्यंत ही स्थिती कायम ठेवा. दिवसातून तीन वेळा ही क्रिया करा.

१०. वॉल स्क्वॅट्स :

रुग्णाची स्थिती - तुमच्या पाठीला भिंतीवर पूर्णपणे आधार मिळेल अशा प्रकारे उभे राहणे (डोक्यापासून खालपर्यंत).

तोल राखण्यासाठी तुमचे दोन्ही पाय तुमच्या शरीराचा वरचा अर्धा भाग न हलवता भिंतीपासून एक पाऊल पुढे ठेवा आणि आता दोन्ही पायांवर समान भार टाकून स्क्वॅट करण्याचा प्रयत्न करा आणि 10 मोजण्यासाठी स्थिती कायम ठेवा. ही क्रिया दिवसातून तीन वेळा करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com