Palak Paneer Side Effects : पालक पनीरवर ताव मारत असाल तर सावधान; होतील गंभीर साइड इफेक्ट्स

बाहेर गेल्यावर किंवा घरी बनवल्यावर पालक पनीरच्या भाजीवर तूटून पडणारे अनेक लोक
Palak Paneer Side Effects
Palak Paneer Side Effectsesakal

Palak Paneer Side Effects : बाहेर गेल्यावर किंवा घरी बनवल्यावर पालक पनीरच्या भाजीवर तूटून पडणारे अनेक लोक तूम्ही पाहिले असतील. काही लोक तर इतर काही खाणे जणू त्यांच्या जीवावर बेतत असल्यासारखेच केवळ पालक पनीर खातात. पनीर आणि पालक या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक असतात त्यामूळे ते खाणे ते पौष्टीक असते असे मानले जाते.

Palak Paneer Side Effects
Momos Side Effects: तुम्ही मोमोज खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

तूम्हालाही असेच वाटत असेल तर थांबा, आधी तूमचा हा भ्रम दूर करा. कारण, एका संशोधनानूसार पालक पनीर खाणे आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देणारे ठरत आहे. पालक आणि पनीर एकत्र खाणे शरीरात असलेले लोह कमी होते. कारण, पनीर शरीरात असलेले सर्व लोह शोषून घेते.

Palak Paneer Side Effects
Headphones Side Effects: सावधान...! ‘Headphones' वापराताय?; तिशीत येतेय बहिरेपण

डायटीशियन न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांच्या सल्ल्यानूसार पालकासोबत पनीर खाल्ल्याने कॅल्शियम आणि लोह एकत्र मिळते. पण, कॅल्शियम अती प्रमाणात गेल्याने लोहाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीराला लोह मिळत नाही आणि त्याची कमतरता होते. पालक-पनीरऐवजी पालक-बटाटा किंवा पालक-कॉर्न खाल्ले तर फायदेशीर ठरते.

Palak Paneer Side Effects
Tight Bra Side Effects : तुम्हीही फिट्ट ब्रा वापरताय? थांबा करावा लागेल गंभीर आजाराचा सामना

आपण केवळ पोषक पदार्थ खातो. पण, कोणते पदार्थ कोणात्या दुसऱ्या पदार्थासोबत खावेत किंवा खाऊ नयेत हेही जाणून घेतले पाहिजे. कारण, एखाद्या पदार्थांमध्ये असलेले पोषक घटक एकमेकांची पौष्टीकता कमी करू शकतात.

Palak Paneer Side Effects
Smartphone Side Effects : 'या' गॅजेट्सचा लैंगिक क्षमतेवर होतो विपरीत परिणाम

मुतखड्याची शक्यता

पालक पनीर खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. यामूळे तूम्हाला मुतखड्याचा त्रासही होऊ शकतो. कारण पालकमध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असते. जे पनीरमधील कॅल्शियमचे गुणधर्म कमी करतात. हे कमी गुणधर्म असलेले कॅल्शियम किडनीमध्ये जमा होते आणि त्याचे खडे तयार होतात.

Palak Paneer Side Effects
Rava Batata Puri Recipe : पुरी खायला आवडते? पण कधी रवा बटाटा पुरी ट्राय केली आहे का?

या आजारांनाही द्याल आमंत्रण

पालक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याच्या समजूतीने त्याचे जास्त सेवन केल्याने त्याचे दुष्परिणाम होतात. पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस, किडनी स्टोन, सांधेदुखी, रक्त घट्ट होणे, पोट फुगणे असे आजार होऊ शकतात.

Palak Paneer Side Effects
Diabetes Patient Health Care: मधुमेहाच्या रुग्णांनी चप्पल बूट खरेदी करतानासुद्धा घ्यावी ही विशेष काळजी

पालकसोबत काय खाऊ नये

मूळात पालकमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामूळे ज्या पदार्थांमध्ये कॅल्शियम कमी असेल असेच पदार्थ पालकसोबत मिक्सकरून खावेत. दही, दूध, टोफू आणि चीज यात कॅल्शिअम जास्त असते ते पालक सोबत खाऊ नयेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com