Peanut For Health: शेंगदाणे खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?

शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
भुईमूग (Peanuts)
भुईमूग (Peanuts) Esakal

शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु काही लोकांसाठी शेंगदाणे खाणे हानिकारक ठरू शकते. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया शेंगदाणे खाण्याचे फायदे काय आहेत आणि कोणत्या लोकांना शेंगदाणे खाणे त्रासदायक ठरू शकते. शेंगदाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. म्हणून शेंगदाण्याला गरीबांचा बदाम म्हटले जाते कारण ते खाणे बदामाइतकेच फायदेशीर आहे. शेंगदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने, कार्ब्स, फायबर आणि फॅटी ऍसिडचे गुण असतात. हे खाल्ल्याने शरीराला जेवढे फायदे होतात तेवढे तोटे देखील होतात.

1) जर तुम्हाला हायपोथायरॉईड असेल तर शेंगदाणे खाल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. शेंगदाणे खाल्ल्याने TSH (Thyroid-stimulating hormone) ची पातळी वाढते. ज्यामुळे हायपोथायरॉईडीझम वाढते. शेंगदाणे जास्त खाणे हानिकारक असू शकते. परंतु शेंगदाणे कमी प्रमाणात सेवन केले कदाचित कमी प्रमाणात घातक आहे. 

भुईमूग (Peanuts)
Kidney: किडणीच्या आजाराची मुख्य लक्षणे आणि उपाय

2) जर तुम्हाला यकृताची समस्या असेल तर तुम्ही शेंगदाणे   खाणे टाळलेच पाहिजे. शेंगदाण्यामध्ये असलेले घटक यकृताच्या  आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात आणि ते खाल्ल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. जास्त शेंगदाणे खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते आणि अपचन होते.

भुईमूग (Peanuts)
Winter 2022: आरोग्यवर्धक तुळशीचा चहा बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा...

3) काही लोकांना विशिष्ट प्रकारच्या अन्नाची ऍलर्जी असते. अनेकांना शेंगदाण्याची अॅलर्जी असते. ज्या लोकांना शेंगदाण्यांची ऍलर्जी आहे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्वचेला खाज सुटते. अशा स्थितीत अॅलर्जी असलेल्यांनी शेंगदाणे खाणे टाळलेलेच बरे राहु शकत.

भुईमूग (Peanuts)
Tulsi Vivah 2022: तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?

4) शेंगदाण्यामध्ये भरपूर पोषक असतात. हे खाणे आरोग्यदायी आहे. परंतु त्यात असलेल्या फॅटमुळे वजन वाढू शकते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा आहार घेत असाल तर शेंगदाणे खाणे टाळा. बदाम स्प्राउट्समध्ये मिसळून थोड्या प्रमाणात सेवन केले जाऊ शकतात.

भुईमूग (Peanuts)
Tulsi Vivah 2022: तुळशीचे लग्न कसे करावे, सोपी पद्धत जाणून घ्या...

आता बघू शेंगदाणे खाण्याचे फायदे काय आहे?

1) शेंगदाणे खाणे हृदयासाठी फायदेशीर आहे. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे पोषक घटक शेंगदाण्यात असतात. ते खाल्ल्याने शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

2) शेंगदाणामध्ये ऑलिव्ह ऑइलसारखे चांगले फॅट असते. ते जळजळ कमी करण्याचे काम करते. यामध्ये मॅग्नेशियम असते, जे इन्सुलिनचा स्राव नियंत्रित करण्याचे काम करते. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी शेंगदाणे प्रभावी ठरू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com