esakal | १८ वर्षांवरील तरुणांनो, लस घ्यायला जाताय? आधी हे वाचा

बोलून बातमी शोधा

corona vaccination
१८ वर्षांवरील तरुणांनो, लस घ्यायला जाताय? आधी हे वाचा
sakal_logo
By
शर्वरी जोशी

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १ मेपासून हे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. परंतु, १८ वर्षांवरील व्यक्तींनी कोरोनाची लस घेतल्यानंतर काही खबरदारी बाळगणं अत्यंत गरेजंच आहे. कोरोनाची लस घेतली म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाही असा समज करणं घातक आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी ते पाहुयात.

राष्ट्रीय रक्त संप्रेषण परिषदने लसीकरण व रक्तदान याविषयीची एक गाइडलाइन जारी केली असून १८ वर्षांवरील तरुणांनी कोणती काळजी घ्यावी हे नमूद करण्यात आलं आहे.

रक्तदान करु नका -

लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर ५६ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. तर, दुसरा डोस घेतल्यावर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही.

मद्यपान करु नका -

लसीकरणानंतर तुम्ही मद्यपानदेखील करु शकत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर शरीरात अॅटी बॉडी तयार होतात. त्यामुळे वॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस घेईपर्यंत मद्यपान करता येत नाही.

हेही वाचा: माणुसकी जिवंत आहे का? कत्तलखान्यात पाठवण्यासाठी ५० कुत्र्यांना केलं पिंजऱ्यात बंद

दुसरा डोस नक्की घ्या-

अनेक जण लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करतात. मात्र, असं अजिबात करु नका. पहिल्या डोसप्रमाणेच दुसरा डोस घेणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरा डोस घेतल्यावरच शरीरात अॅटी बॉडीज तयार होतात. त्यामुळे दुसरा डोस आवश्य घ्या.

नियमांचं पालन करा -

कोरोनाचं लसीकरण झाल्यानंतरही कोरोना नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. लस घेतल्यानंतर आपल्याला कोरोना होणार नाही असा समज करुन घेणं चुकीचं आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे.