मला पोटात सतत जळजळ होत राहते. अँटासिड घेतल्या तरी ॲसिडिटी कमी होत नाही. जेवणाला थोडाही उशिर झाला किंवा नीट झोप झाली नाही तर लगेच अंगावर छोट्या गांधी उठतात, खाजही सुटते. काय करावे याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
- सावनी बडवे, सोलापूर
उत्तर - पित्त प्रकृतीच्या लोकांना जेवायला उशीर झाला किंवा झोप नीट झाली नाही की वेगवेगळ्या प्रकारचे पित्ताचे त्रास होताना दिसतात. त्यासाठी आपली दिनचर्या चुकणार नाही याची काळजी घेणे जास्त उत्तम असते. बरोबरीने रोज नियमाने संतुलन पित्तशांतीसारख्या गोळ्या व रात्री झोपताना सॅनकूलसारखे एखादे चूर्ण नियमाने घ्यावे. आठवड्यातून २-३ वेळा संतुलन अविपत्तिकर चूर्ण घेतल्याचाही फायदा मिळू शकेल. आहारात जास्त प्रमाणात तिखट घेणे टाळावे, उलट संतुलन स्पेशल गुलकंद हा आहाराचा एक भाग म्हणून नियमित घेणे सुरू करावे. रोज रात्री न चुकता संतुलन पादाभ्यंग किटने पादाभ्यंग केल्याचा फायदा मिळू शकेल. एकूणच पित्त कमी होण्याच्या दृष्टीने २-३ आठवड्यातून एकदा एरंडेल तेलाचे विरेचन घेणे आणि जमेल तसे वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली संतुलनचे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचाही फायदा मिळू शकेल.