Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? बिनधास्त लोणचं खा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss Tips

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? बिनधास्त लोणचं खा...

अनेकांना जेवणासोबत चटकदार तोंडी खावसं वाटतं अशात जेवणात पापड किंवा चटणी किंवा लोणचं हवं असते. मात्र अनेकजण सर्दी खोकला नको व्हायला यासाठी लोणचं खाणे टाळतात पण तुम्ही जर लोणचं खाण्याचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल. कारण लोणचं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. होय.

आज आपण लोणचं खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. ( pickles is good for health and helps to make weight loss )

लोणचं खाण्याचे फायदे

1. अनेकांना फारशी भूक लागत नाही किंवा जेवण जात नाही. पण जेवणात कैरीचं किंवा लिंबाचं लोणचं समाविष्ट केल्यास तोंडात लाळ जास्त स्त्रवते ज्यामुळे भूक वाढते. आणि उत्तम जेवण होतं

2. मधूमेही रुग्णांनी आवळ्याचं लोणचं खावं. ते त्यांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतं.

3. मुरवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक नावाचे जिवाणू असतात. आतड्यांच्या आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर असतात.

हेही वाचा: Heart Attack : अचानक हार्ट अटॅक आला तर फक्त 'या' 3 स्‍टेपनी वाचवा जीव

4. अनेकांना वजन वाढीच्या समस्या असतात. अशात लोणचं खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण लोणच्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अधिक असतं.

5. लोणच्यामध्ये व्हिटामिन्स के असतं जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याशिवाय लोणच्यामध्ये अँटीऑंक्सिडट्स घटक असतात.

6. लोणचं पचनक्रिया वाढविण्यासही मदत करते. त्यामुळे आवर्जून जेवणात लोणचं खावं, असा अट्टहास असतो.