Plastic Waste : दरवर्षी भारतात तयार होतो 129.4 लाख टन कचरा

जगातला प्लास्टिक कचरा ३५ कोटी टनांहून अधिक आहे.
Plastic Waste
Plastic Wasteesakal

अशोक तातुगडे

Plastic Waste : प्रत्येक देशात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची आकडेवारी भयावह आहे. काही देशांतल्या नुसत्या प्लास्टिकच्याच कचऱ्याची आकडेवारी गंभीर आहे. दरवर्षी भारतात १२९.४ लाख टन, चीन १२२.७ , फिलिपिन्स ४०.२५, ब्राझील ३२.९६, नायजेरिया १९.४८, टांझानिया १७.६४, टर्की १६.५६, इजिप्त १४.३५ इतका कचरा निर्माण होत आहे. हे फक्त नमुन्यादाखल आहे, अशीच परिस्थिती अन्य सर्व देशांचीही आहे.

जगातला प्लास्टिक कचरा ३५ कोटी टनांहून अधिक आहे. अमेरिका, रशिया, जपान, चीन, ब्राझील आणि जर्मनी हे देश सगळ्यात जास्त कचरा निर्माण करतात. या बाबतीत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी अमेरिकेची लोकसंख्या फक्त ५ टक्के आहे, परंतु अमेरिका संपूर्ण जगातल्या कचऱ्यापैकी ३० टक्के कचरा निर्माण करते. सर्वसामान्य अमेरिकन नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा १५० पट जास्त कचरा तयार करतो.

अमेरिकेमध्ये दरवर्षी २.७ कोटी टन अन्न कचऱ्यात फेकून दिले जाते. ८५ कोटी टन फर्निचरचा कचरा टाकून दिला जातो. ६३ लाख टन कपडे कचऱ्यात टाकले जातात. अमेरिकेमध्ये ८० टक्के कपडे फक्त एकदाच वापरून टाकून दिले जातात. ९५ टक्के प्लास्टिकच्या बाटल्या आणि शीतपेयांचे ५० टक्के कॅन्स पुन्हा कधीच वापरले जात नाहीत. ते जमिनीत गाडले जातात किंवा समुद्रात फेकले जातात.

एका अहवालानुसार, प्रगत आणि जास्त उत्पन्न असलेले देश अप्रगत आणि प्रगतशील देशांपेक्षा खूप जास्त कचरा निर्माण करतात. दरवर्षी तयार होणारा कचऱ्यापैकी ४६ टक्के कचरा दरडोई जास्त उत्पन्न असलेल्या देशांमध्ये निर्माण होतो. मध्यम उत्पन्नाचे देश २९ टक्के कचरा निर्माण करतात आणि निम्न उत्पन्न असलेले देश १९ टक्के कचरा निर्माण करतात, तर गरीब देश ६ टक्केच कचरा निर्माण करतात.

Plastic Waste
Plastic Bottle Germs : प्लास्टिकच्या बॉटलने पाणी का पिऊ नये? कारण वाचाल तर...

कचरा निर्मितीचे एकूण सहा प्रकार आहेत.

  • कारखान्यांचा (औद्योगिक)

  • सांडपाणी

  • घरामधील

  • बांधकामाचा

  • वैद्यकीय

  • इलेक्ट्रॉनिक वस्तू

वैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक्स कचरा यांना ‘विशेष कचरा’ म्हणतात. या प्रकारचा कचरा हाताळताना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण त्यातले अनेक घटक विषारी असतात. सगळ्या प्रकारच्या कचऱ्यापैकी कारखान्यामधून निर्माण होणारा कचरा सर्वाधिक म्हणजे ७६ टक्के असतो. वैद्यकीय आणि इलेक्ट्रॉनिक कचरा १८, बांधकामाचा ३.५ आणि घरगुती कचऱ्याचे प्रमाण २.५ टक्के आहे. पुढील भागात कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतात, त्याची माहिती घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com