Polio Vaccination : पोलिओ डोज चुकवला तर काय परिणाम होतील? वेळीच घ्या काळजी नाहीतर...

आज आपण पोलिओचा डोज चुकल्यास त्याचे नेमके काय परिणाम भोगावे लागू शकतात ते जाणून घेऊया
Polio Vaccination
Polio Vaccinationesakal

Polio Dose : लहान मुलांसाठी पोलिओचा डोज हा फार महत्वाचा मानला जातो. पोलिओचे डोज चुकवल्यास त्याचा गंभीर परिणाम तुमच्या मुलांना भोगावा लागू शकतो. आजच्या दिवशी १९५५ मधे योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली होती. यानिमित्ताने आज आपण पोलिओचा डोज चुकल्यास त्याचे नेमके काय परिणाम भोगावे लागू शकतात ते जाणून घेऊया.

पूर्वी जे गरिब देश होते त्या देशांत पोलिओचे रुग्ण अधिक आढळत, मात्र आता जगभरातून पोलिओ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. भारतात पाच वर्षांच्या आतील मुलांना तोंडाद्वारे पोलिओचा डोस देण्यात येतो. 

Polio Vaccination
Polio virus : अमेरिका, ब्रिटन, मोझांबिकमध्ये पोलिओचा विषाणू

पोलिओचा डोज चुकवू नका नाहीतर...

पोलिओ मोहिमेबाबत माहिती देताना डॉ. धन्या धर्मापालन यांनी म्हटले आहे की, पोलिओचा संसर्ग हा लहान मुलांना अधिक असतो. सरासरी वय 15 महिन्यांच्या आतील बालकांना तसेच जे बालकं स्तनपान करतात त्यांना पोलिओचा धोका अधिक असतो. त्यामुळे पाच वर्षांच्या आतील मुलांना पोलिओचा डोस देणे आवश्यक आहे. भारतात पोलिओ आजाराचे निर्मूलन झाले आहे. मात्र बालकांना वेळेच्यावेळी पोलिओ लस देणे महत्त्वाचे असल्याचे धर्मापालन या म्हणाल्या आहेत. (Health)

Polio Vaccination
Polio vaccine: रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना पोलिओ डोस

तीन प्रकारच्या विषाणूमुळे होतो पोलियो

एकूण तीन प्रकारच्या पोलिओ विषाणूमुळे पोलिओ होतो. याचा सर्वाधिक धोका हा बालकांना असतो. पोलिओचे विषाणू हे मध्यवर्ती चेतासस्थेवर परिणाम करतात. पोलिओ हा प्रौढ व्यक्तीला देखील होऊ शकतो. मात्र त्याचा धोका हा सर्वात जास्त लहान मुलांना असतो. दाट लोकवस्ती, निकृष्ट राहणीमान अस्वच्छता अशा वातावरणात पोलिओ सहज पसरतो. लहान मुलांप्रमाणेच वृद्ध, गरोदर महिला, प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती आणि नुकत्याच टॅन्सिल काढून टाकलेल्या व्यक्तीलाही पोलिओचा धोका अधिक असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com