Breast Milk : हाय कॅलरीज अन्‌ भावनिक बंधातून मातेला फुटतो दुधाचा पान्हा

आईचं दूध हे अमृताच्या समान आहे. बाळाच्या सुदृढ व निरोगी आहारासाठी आईच्या दुधाला पर्यायच नाही.
foods how to increase breast milk naturally at home
foods how to increase breast milk naturally at homesakal

- प्रमिला चोरगी

Breast Milk : प्रसूतीनंतर मातेचे दूध वाढविण्यासाठी ना-ना उपाय करण्याची गरज नाही. तर दूध, तूप, रोटी अशा खाद्यपदार्थांच्या सेवनाने शरीरातील हाय कॅलरीज वाढविणे. (how to increase breast milk naturally)

मातृत्वाचा आनंद घेणे तसेच बाळाला उराशी लावून बाळाच्या गालाचा स्पर्श मातेच्या छातीला आणि बाळाचं पोट आईच्या पोटाला लावून दूध पाजल्याने स्पर्शातून होणाऱ्या भावनिक बंधातून मातेला फुटतो दुधाचा पान्हा.

आईचं दूध हे अमृताच्या समान आहे. बाळाच्या सुदृढ व निरोगी आहारासाठी आईच्या दुधाला पर्यायच नाही. मात्र, बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आईच्या दुधावरदेखील झालेला आहे. आजच्या मातांमध्ये दुधाचे प्रमाण घटले आहे. इंजेक्शन व गोळ्यांद्वारे दुधाचे प्रमाण वाढविणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

परंतु, नैसर्गिकरित्या प्राप्त होणारे मुबलक दूध हे बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. सगळ्यात महत्त्वाचं कारण आजकाल ताणतणाव घेण्याचे प्रमाण अधिक आहे.

तथापि,आजची युवा पिढी अगदी छोट्या-छोट्या गोष्टीसाठीही ताण घेते. दूध निर्मितीची प्रक्रिया ही हार्मोन कमी पण तिच्या मानसिकतेवर अधिक अवलंबून आहे. मानसिकदृष्ट्या ती आनंदी असणे गरजेचे आहे, मगच दूध वाढतं. ताण आला की दूध कमी होते किंवा घटते.

तसेच प्रसूतीनंतर घेण्यात येणारा आहारदेखील दूध निर्मितीवर थेट परिणाम करतो. हायकॅलरीजचे पदार्थ न खाता तोंडाचे चोचले पुरविणारे पदार्थ, स्वत:ला आवडणारे वेगवेगळे पदार्थ खाण्यात अधिक रस असतो.

foods how to increase breast milk naturally at home
Baby Care Tips :तुमचं बाळही दर तासाला झोपेतून रडत उठतोय? तज्ज्ञांनी सांगितल कारण, नक्की वाचा

त्यामुळे कॅलरीजची वाढ होत नाही, दूध पडत नाही, उलट फॅटची निर्मिती होते. तसेच आजच्या फॅन्सी गाऊन या बदलत्या पेहरावामुळेही आई आणि बाळाचं भावनिक बंध तयार होण्यात अडथळा निर्माण करते. बाळाला उराशी घेऊन त्वचेच्या स्पर्शानी निर्माण होणाऱ्या भावनिक बंधानेही दुधाचा पान्हा फुटतो.

दूध घटण्याची कारणे

- हार्मोन बदल, नवीन गर्भनिरोधक व इतर औषधांचा अतिरेक. सकस आहाराची कमतरता. छोट्या-छोट्या गोष्टींवर येणारा ताण, टेन्शन आणि कमी झालेली भावनिक नाळ ही दूध घटण्याची प्रमुख कारणे आहे.

foods how to increase breast milk naturally at home
Preterm Babies : वेळेआधीच मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढले; भारतातील परिस्थितीही चिंता वाढविणारी

दूध वाढण्यासाठी हे खावे

- जर्दाळू, खजूर खाल्ल्याने हार्मोन संतुलित राहून तुमच्या शरीराला दूध तयार करण्यास मदत करतो. तसेच शरीरात उच्च कॅलरीजची निर्मिती करण्यासाठी दूध, तूप, रोटी यांचे प्रामुख्याने सेवन केले पाहिजे.

अनावश्यक ताण अन्‌ चुकीच्या पद्धती

- प्रसूतीनंतर माझे वजन तर वाढणार नाही ना?

- प्रसूतीनंतर माझ्या शरीररचनेत बदल होणार नाही ना?

- कॅलरीजयुक्त पदार्थाने फॅट वाढणाऱ्या भीतीने सकस आहार न घेणे

- दूध वाढविण्यासाठी इंटरनेटवर माहिती घेणे, चुकीच्या पद्धतीने अवलंब करणे, प्रत्यक्षात कृती शून्य

- मोबाईलच्या दुनियेत दुरावलेला भावनिक बंध

foods how to increase breast milk naturally at home
Pregnancy : आई-बाबा व्हायचं आहे? ‘सेफ’ एक पर्याय

प्रसूतीनंतर मातांचे दूध घटण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे अशा काळात शरीरात कार्बोहायड्रेट, कॅलरीजची गरज असते. परंतु, फिगर मेंटेंनच्या नादात दूध, तूप आदी गोष्टी टाळल्या जातात. तसेच कुस्करून खाल्ल्याने कॅलरीज वाढतात. मात्र, आजच्या पिढीला त्या पद्धतीचे जेवण आवडत नाही.

तसेच दुसरं कारण म्हणजे ताणतणाव. अनावश्यक ताण घेणे. ज्यामुळे दूध कमी होते. ९० टक्के मातांचे दूध हे ताणामुळे कमी झालेले पाहायला मिळते.

तिसरा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बाळाबरोबरचा भावनिक संबंध. जेव्हा बाळाच्या गालाचा स्पर्श मातेच्या बर्स्टला आणि बाळाचं पोट आईचं पोटाला लागतं त्यावेळी जे एक भावनिक बंध तयार होते.

त्यावेळी भरभरून दूध येण्याला सुरवात होते. बाळाला दूध पाजल्याने शरीराची रचना बिघडत नाही तर उलट दूध पाजल्याने मातेचे आरोग्य चांगले राहण्याबरोबर शरीरातील फॅटही कमी होतो.

- डॉ. किरण सारडा, स्त्रीरोग तज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com