व्यायामाला सुट्टी नाही...!

आयुष्यात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे शारीरिक फिटनेस. आयुष्यात सर्व गोष्टी मिळवता येतात, परंतु शरीर नाही.
pravin tarde health sleep and non addiction important thing to stay fit
pravin tarde health sleep and non addiction important thing to stay fitSakal

- प्रवीण तरडे

आयुष्यात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे शारीरिक फिटनेस. आयुष्यात सर्व गोष्टी मिळवता येतात, परंतु शरीर नाही. वय वाढत जाते तसे शरीरातही बदल होत असतात. त्यासाठी शारीरिक फिटनेस राखणे आवश्यकच आहे. तो राखण्यासाठी माझे दोन प्रकार आहेत. पहिला महत्त्वाचा म्हणजे मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे.

कोणत्याही चुकीच्या व्यसनामुळे शरीराची खूप हानी होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे झोप. काहीही झाले तरी मी आठतास झोप घेतो. कामाच्या धांदलीत रात्री झोपायला उशीर झाला तरी आठ तासांची झोप घेतोच.

दिवसभरातील एक तास व्यायामासाठी देतोच. कोणत्याही परिस्थितीत व्यायामाला सुट्टी घेत नाही. पूर्वी मसल, जोर-बैठका, वेट ट्रेनिंग यावर भर होता. आता कार्डिओवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. माझ्यादृष्टीने सूर्यनमस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत.

गेल्या ३५ वर्षांत मी एकही दिवस सूर्यनमस्काराचा नियम चुकविलेला नाही. दररोज किमान १३ सूर्यनमस्कार घालतोच. झोप, व्यायामाबरोबर मी आहाराबाबत कटाक्ष ठेवला आहे. मी मांसाहार करतो. परंतु फक्त मासे खातो.

सकाळी नाष्ट्यामध्ये अंडी असतात आणि जेवणात पालेभाजी निश्चितच असते. त्यातून शरीराला योग्य प्रमाणात फायबर मिळते. व्यायामाला वेळ नाही, असे म्हणणाऱ्यांचे मला आश्चर्य वाटते. माझ्यामते रिकामटेकडे लोकच ‘व्यायामाला वेळ नाही’ असे म्हणतात.

शारीरिक स्वास्थ्यासाठी दिवसभरात एक तास देऊ शकत नाही, असे होऊच शकत नाही. आपणच शरीराकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मी जेवणाच्या वेळा शक्यतो टाळत नाही. माझा आहार कमी आहे, परंतु वेळेत आहे.

चित्रीकरणाच्या निमित्ताने कधीतरी थोडे कमीजास्त होते. त्याचबरोबर योग्यवेळी पाणी पिण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मी दररोज किमान तीन लिटर पाणी पितो. कोणत्याही परिस्थितीत पाणी बसूनच प्यावे. उभे राहून आपण गडबडीने पाणी पितो त्यामुळे शरीराचे सर्वाधिक नुकसान होते. शरीर आपल्याला काही संकेत देत असतात त्याकडे लक्ष दिले पाहिजे.

व्यायामावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. व्यायामाच्याबाबतीत ‘उद्या’ कधीच नसते. माझे प्रशिक्षक महेश हगवणे कायम सांगतात, ‘व्यायाम उद्यापासून सुरू होत नाही, तर आज, आत्तापासून प्रारंभ केला पाहिजे.’

व्यायामाच्या केवळ गप्पा मारल्याने फारतर एखाद-दुसरी कॅलरीच बर्न होईल. प्रत्यक्ष व्यायामाने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज निश्चितच बर्न होतील. त्यामुळे दिवसभरात शरीरासाठी म्हणजे व्यायामासाठी एक तास दिलाच पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com