
High Blood Pressure in Pregnancy
sakal
High Blood Pressure in Pregnancy: गर्भावस्थेतील उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणे हे किडनीवर (मूत्रपिंड) बेतू शकते. गर्भारपणाच्या सोळाव्या आठवड्यानंतर महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळे दोन्ही किडन्या निकामी होण्याचा धोका असल्याने गर्भधारणेच्या दरम्यान डॉक्टरांना दाखवावे व उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यास त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर उपचार करावेत, असे आवाहन मूत्रपिंडविकारतज्ज्ञांनी केले आहे.