Protein Intake Tips : तुमच्या वजनानुसार तुम्हाला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या

प्रोटीन पावडर काय असतं, त्याचे किती प्रकार असतात शिवाय याचे फायदे आणि तोटे काय आहे याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया
Protein Intake Tips
Protein Intake Tipsesakal

Protein Intake Tips : जगभरात मोठ्या प्रमाणात प्रोटीन पावडरची विक्री दिसून येते. मात्र तुमच्या शरीराच्या वजनानुसार तुम्हाला किती प्रोटीनची गरज आहे याबाबत तुम्हाला कल्पना आहे काय? प्रोटीन पावडर काय असतं, त्याचे किती प्रकार असतात शिवाय याचे फायदे आणि तोटे काय आहे याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

भारतासह जगभरात प्रोटीनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये अशी माहिती पुढे आलीय की, लंडनमध्ये राहाणाऱ्या १६ वर्षीय रोहन गोधनियाचा प्रोटीन शेक पिल्याने मृत्यू झाला. त्याच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, मुलाच्या शरीरात प्रोटीनची मात्रा फार जास्त असल्याने त्याला एक दुर्मिळ आजार झाला. ज्यास ऑर्निथिन ट्रांसकार्बामायलेजची कमतरता (ओटीसी) च्या नावाने ओळखले जाते.

टाटा कंज्यूमर प्रोडक्टच्या पॅकेज्ड फूड्सच्या अध्यक्षा दीपिका भान यांनी मागल्या वर्षी मीडियाला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये असे म्हटले होते की, हेल्थ फूड बिझनेसचा असा अंदाज आहे की भारतात प्रोटीन सप्लिमेंटची किंमत 3-4 कोटी रुपये आहे आणि पुढल्या काही वर्षात यात 15-20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

भारताबाबत बोलायचे झाल्यास रिसर्चमधून असे पुढे आले आहे की, भारतात उपलब्ध असलेल्या अनेक सप्लिमेंट्सची कॉलिटी खराब आहे. FSSAI च्या रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे की, भारतात विकलं जाणारं 15 टक्के प्रोटीन पावडर आणि डायट्री सप्लीमेंट्स असुरक्षित आणि क्लॉलिटी स्टँडर्डच्या खाली आहे.

प्रोटीन पावडर सुरक्षित मानले जात असले तरी अनेक प्रकरणांत प्रोटीन पावडर गंभीर आजारांचे कारण मानले जाते. अनेकांना प्रोटीन पावडरची माहिती नसते तरीसुद्धा ते डॉक्टर आणि तज्ञांच्या सल्ल्याशिवाय त्याचे सेवन करू लागतात. तुम्ही देखील प्रोटीन पावडरचे सेवन करत असाल किंवा ते घेण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. चला तर मग आधी जाणून घेऊया, प्रोटीन पावडर म्हणजे नक्की काय ते?

प्रोटीन पावडर काय असते?

हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या मते प्रोटीन पावडर हे वनस्पती, अंडी आणि दुधापासून तयार केलेली कोरडी पावडर आहे. हा प्रथिनांचा मुख्य स्त्रोत आहे. यामध्ये साखर, आर्टिफिशीयल फ्लेवर, जीवनसत्त्वे, एन्झाईम्स आणि मिनरल्स यांसारख्या घटकांचा समावेश होतो. यामध्ये शरीराच्या गरजेनुसार सर्व अमिनो अॅसिड असतात, ज्याचा शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होतो.

बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रोटीन पावडरच्या प्रति स्कूप प्रोटीनचे प्रमाण 5 ते 35 ग्रॅम पर्यंत असू शकते. हे मुख्यतः स्नायू वाढणे, वजन कमी करणे, तीव्र व्यायामानंतर स्नायू पुनर्प्राप्तीसाठी वापरले जाते.

Protein Intake Tips
Protein Powder: प्रोटीन पावडरचे धोके वाचलेत तर स्वप्नातही विकत घेणार नाहीत...

प्रोटीन पावडर किती सुरक्षित आहे जाणून घ्या

आहारतज्ज्ञ लक्ष्मी मिश्रा यांनी प्रोटीनच्या अतिवापराबद्दल सांगितले की, '२० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनी कोणत्याही प्रकारची प्रोटीन पावडर खाणे टाळावे. त्यांनी प्रोटीनची कमतरता नैसर्गिक अन्नातूनच भरून काढण्याचा प्रयत्न करावा. प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या कारण शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त असले तरी अनेक समस्या उद्भवू शकतात.

आहारतज्ज्ञ लक्ष्मी पुढे म्हणाल्या, 'सामान्य व्यक्तीने ०.८ ग्रॅम ते १.२ प्रति किलो शरीराच्या वजनानुसार प्रोटीन घेतले पाहिजे. यापेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्यास ते सर्व वाया जाईल आणि किडनीवर अधिक दबाव येऊ शकतो. (Protein)

संशोधनानुसार, प्रथिनांच्या अतिसेवनामुळे हृदयाशी संबंधित आजार, रक्तवाहिन्यांचे विकार, यकृत-मूत्रपिंडाचे आजार आणि मृत्यूही होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, प्रथिनांच्या अतिसेवनामुळे टाईप 2 मधुमेह, कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार देखील होऊ शकतात.

Protein Intake Tips
Protein Source : प्युअर व्हेजिटेरियन्ससाठी प्रोटीनचा उत्तम सोर्स ठरतील या 6 भाज्या

सेलिब्रिटी फिटनेस कोच योगेश भटेजा म्हणतात की, प्रथिनांचे प्रमाण वय, शरीराची गरज आणि फिटनेस लेव्हलवर अवलंबून असते. सामान्य लोक 0.8 ते 1.2 ग्रॅम प्रति किलो शरीराच्या वजनानुसार प्रोटीन घेऊ शकतात, अॅक्टिव्ह लाइफस्टाइल आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करणारे लोक 1.2 ते 1.8 ग्रॅम प्रति किलो शरीराच्या वजनानुसार आणि प्रो लेव्हल ऍथलीट 1.5 ते 2.2 ग्रॅम प्रति किलो शरीराच्या वजनानुसार प्रोटीन घेऊ शकतात. (Lifestyle)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com