तर काय?

माझी नात चार वर्षांची आहे, तिला कोरोनाच्या काळापासून बालदम्याचा त्रास सुरू झालेला आहे. बरीच औषधे केली, परंतु फरक पडत नाही.
childhood asthma
childhood asthmasakal

माझी नात चार वर्षांची आहे, तिला कोरोनाच्या काळापासून बालदम्याचा त्रास सुरू झालेला आहे. बरीच औषधे केली, परंतु फरक पडत नाही. वारंवार दवाखान्यात जाऊन श्‍वासाचे यंत्र तिला लावावे लागते, त्यानंतरच तिला बरे वाटते. या त्रासामुळे तिची झोपही नीट होत नाही. काही उपाय असले तर सुचवावे.

- सौ. वासंती, सोलापूर

उत्तर - कोरोनानंतर बऱ्याच लहान-मोठ्यांमध्ये अशा प्रकारची तक्रार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे. एकूणच श्‍वसनसंस्थेची प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे हे निदर्शक आहे. मुलीला सॅन अमृत चहासारखा चहा एक छोटा कपभर द्यायला सुरुवात करावी. शक्य होईल तेव्हा पिण्यासाठी कोमट पाणी देण्याचा उपयोग होईल. संतुलन सीतोपलादी चूर्ण तसेच ब्राँकोसॅन सिरप देण्याचाही फायदा होईल.

रात्री झोपताना संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे एखादे तेल छातीला हलक्या हाताने नक्की लावावे, त्याचबरोबर ओव्याच्या पुरचुंडीने छाती, घसा शेकण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी नस्यसॅन घृतासारख्या तुपाचे १-२ थेंब नाकात टाकल्यास व्यवस्थित झोप लागायला मदत मिळू शकेल. शक्य असल्यास प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतले तर प्रकृतीनुसार व्यवस्थितपणे उपाय सुचवणे सोपे होईल.

माझे वय ६७ वर्षे आहे. दोन महिन्यांपूर्वी फिरायला गेले असता पाय अडकल्याचे निमित्त झाले. तेव्हापासून चालताना कंबरेच्या उजव्या बाजूचा भाग खूप दुखतो व त्या वेदना पायापर्यंत जातात. सगळ्या तपासण्या केल्या तेव्हा स्नायूमध्ये लचक आहे असे निदर्शनास आले आहे. गेले २-३ महिने वेदनाशामक औषधे घेतो आहे. पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नाही. काठी घेऊनच चालावे लागते आहे. काठीशिवाय चालण्याचा प्रयत्न केला तर भरपूर वेदना होतात. कृपया मार्गदर्शन करावे.

- श्री. नमन, पुणे

उत्तर - कुठल्याही प्रकारचा आघात झाला की शरीरात वात प्रकुपित होतो. त्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यास नंतर अशा प्रकारे बरेच दिवस दुखणे सहन करावे लागू शकते. फक्त वेदनाशामक औषधे घेतल्याने त्रास कमी होत नाही. सर्वप्रथम औषधांनी सिद्ध केलेले संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासारखे एखादे तेल पाठीला खालून वरच्या दिशेला हलक्या हाताने नक्की लावावे, तसेच पायाला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे एखादे तेल खालून वरच्या दिशेला हलक्या हाताने दिवसातून एकदा तरी जिरवावे.

उपलब्ध असल्यास निर्गुडीची पाने वाफवून त्याने पायाला शेक करण्याचा फायदा होऊ शकेल. आत्मसंतुलनमध्ये शास्त्रोक्त पंचकर्म करत असताना अशा प्रकारच्या त्रासांवर फार पटकन मदत करता येते असा अनुभव आहे. त्याकरिता वेळ काढता आला तर उत्तम. बरोबरीने संतुलन वातबल गोळ्या, संतुलन प्रशांत चूर्ण, संतुलन संदेश आसव, दशमूलारिष्ट घेण्याचासुद्धा फायदा होऊ शकेल. अशा त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार करावे, अन्यथा यातून भविष्यात मोठे त्रास होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com