Bombay Blood Group: असाही ब्लड ग्रुप असतो? वाचा दुर्मिळ आणि प्रामुख्याने मुंबईतच आढळणाऱ्या बॉम्बे ब्लड ग्रुपबद्दल

What is Bombay Blood Group and Why is it Rare: फक्त १०,००० पैकी एक व्यक्ती असतो बॉम्बे ब्लड ग्रुपचा धारक – जाणून घ्या याबद्दल सविस्तर!
Mumbai Rare Blood Group Cases
Mumbai Rare Blood Group CasesSakal
Updated on

Blood Donation Challenges for Rare Blood Types in India: मानवी शरीरात जसा डीएनए वेगळा असतो तसाच वेगवेगळ्य प्रकारचा ब्लड ग्रुपही असतो. या ब्लड ग्रुपचे मुख्य ४ प्रकार असतात. ते म्हणजे A, B, AB किंवा O. आणि त्यांचे Rh पॉझिटिव्ह व नेगेटिव्ह असे उपप्रकार असतात. पण या सर्वांहून वेगळा आणि अत्यंत दुर्मिळ असा एक ब्लड ग्रुपआहे हे तुम्हाला माहित आहे का?

सामान्य ब्लड ग्रुपपेक्षा वेगळा असा एक ब्लड ग्रुप आहे ज्याला 'बॉम्बे ब्लड ग्रुप' असे म्हणले जाते. हा ब्लड ग्रुप १०,००० भारतीयांपैकी फक्त एका व्यक्तीमध्ये आढळतो. काय आहे नक्की ब्लड ग्रुप? तो कसा ओळखायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय आहे बॉम्बे ब्लड ग्रुप?

या ब्लड ग्रुपला वैज्ञानिक भाषेत HH ब्लड ग्रुप असे म्हणतात. या रक्तगटात H नावाचा घटक (अँटीजन) अजिबात नसतो. सामान्यतः, शरीरात A आणि B ब्लड ग्रुप तयार होण्यासाठी H अँटीजन लागतो. पण बॉम्बे ब्लड ग्रुपमध्ये तो नसल्यामुळे, अशा व्यक्तींच्या रक्तात A, B किंवा O या कुठल्याही ब्लड ग्रुपचे गुणधर्म दिसत नाहीत.

हीच गोष्ट या ब्लड ग्रुपला इतर सर्व ब्लड ग्रुप्सपेक्षा वेगळे करते. त्यामुळे अशा व्यक्तींना फक्त त्यांच्या सारख्याच ब्लड ग्रुपच्या व्यक्तीकडूनच रक्त चढवता येते.

Mumbai Rare Blood Group Cases
Plastic Eating Bacteria: काय सांगता, प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूचा शोध लागलाय, तेही आपल्या सोलापूरात?

कोणी लावला या ब्लड ग्रुपचा शोध?

१९५२ साली मुंबईत डॉ. वाय. एम. भेंडे यांनी या ब्लड ग्रुपचा शोध लावला. म्हणूनच याला “बॉम्बे ब्लड ग्रुप” असे नाव देण्यात आले. जगात फारच थोड्या लोकांमध्ये हा ब्लड ग्रुप सापडतो. विशेष म्हणजे, मुंबईतच ह्या ब्लड ग्रुपची सापडण्याची शक्यता जास्त असते. मुंबईत दर १०,००० लोकांमध्ये एकजण सापडतो आणि युरोपात तर दहा लाखांमध्ये एखादाच व्यक्ती या ब्लड ग्रुपचा सापडतो.

अशा लोकांना रक्त कसे मिळते?

बॉम्बे ब्लड ग्रुप (HH) असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत ब्लड टेस्टमध्ये अनेकदा गोंधळ होतो, कारण H अँटीजन नसल्यामुळे त्यांचा ब्लड ग्रुप O गटासारखा भासतो. पण जेव्हा क्रॉस मॅचिंग केली जाते, तेव्हा तो O ब्लड ग्रुपशी जुळत नाही, आणि खरी अडचण तिथेच उभी राहते.

म्हणूनच रुग्णालयात ब्लड ग्रुप निश्चित करताना केवळ ब्लड ग्रुप टेस्ट न करता, क्रॉस मॅचिंगला खूप महत्त्व दिले जाते. HH ब्लड ग्रुप असलेले रुग्ण A, B, AB किंवा O या कोणत्याही इतर ब्लड ग्रुपचे रक्त स्वीकारू शकत नाहीत.

त्यांना फक्त अशाच दुसऱ्या HH ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीकडूनच रक्त दिले जाऊ शकते. त्यामुळे अशा दुर्मीळ रक्तदात्यांचा शोध घेणे हे खरंच फार कठीण आणि वेळखाऊ काम ठरते.

Mumbai Rare Blood Group Cases
Eco-Friendly Bakra Eid 2025: अशी साजरी करा इको फ्रेंडली बकरी ईद, पर्यावरण दिनानिमत्त जाणून घ्या काही खास टिप्स

आपण काय करु शकतो?

दुर्मीळ ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींचे जीवन वाचवण्यासाठी समाजात जागरूकता वाढवणे, रक्तदात्यांची नोंद ठेवण, आरोगी व पात्र व्यक्तींनी वेळोवेळी जवळच्या ब्लड बँकमध्ये जाऊन रक्तदान करणे आणि गरज पडल्यास मदतीला धावणे. या साध्या व सोप्या गोष्टी केल्यास दुर्मीळ ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना मदत होऊ शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com