|| बोल संतांचे || : श्रद्धा आणि अंधश्रद्धा

संत एकनाथांच्या विचारांतून खरी श्रद्धा व अंधश्रद्धेतील सूक्ष्म भेदाची उकल; नामस्मरण, वारी, भजन-कीर्तन यांस अंधश्रद्धा ठरवणाऱ्या प्रवृत्तीवर नेमका प्रहार
Faith vs. Superstition: Understanding the Thin Line through Saint Eknath’s Vision

Faith vs. Superstition: Understanding the Thin Line through Saint Eknath’s Vision

Sakal 

Updated on

संत एकनाथ महाराज

योगिराज महाराज पैठणकर

श्रद्धेला अंधश्रद्धा समजणे आणि अंधश्रद्धेला श्रद्धा समजणे हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल. नामस्मरण, वारी, भजन-कीर्तन, मंत्र जप आदी श्रद्धेच्या विषयांस अंधश्रद्धा असे नाव देऊन काही मंडळी लोकांच्या श्रद्धेला हात घालत असतात. खरेतर श्रद्धेला अंधश्रद्धा मानणे यापेक्षा दुसरी मोठी अंधश्रद्धा असू शकत नाही. श्रद्धा म्हणजे विश्वास, श्रद्धा म्हणजे आदर, श्रद्धा म्हणजे समर्पण भाव.

ब्रह्मात्मैक्य विद्येचा उपदेश करणारे सद्‍गुरू व वेदांत वाक्याच्या ठिकाणी असणाऱ्या अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात, अशी वेदांत ग्रंथात श्रद्धेची व्याख्या करण्यात आली आहे. व्यावहारिक पातळीवर आमचे दैनंदिन व्यवहार विश्वासावर चालत असतील, तर पारमार्थिक पातळीवर तर तो निश्चितच असावयास हवा. गाडी चालवीत असताना रस्त्याने समोरून येणारी भरधाव गाडी ही आमच्या अंगावर येणार नाही, हा विश्वास ठेवूनच गाडी चालवावी लागेल. अन्यथा, घरी बसण्याची वेळ येईल. दुसरे उदाहरण पहायचे झाले, तर बाप आपल्या लहान मुलास उंच उडवून पुन्हा झेलतो. हा खेळ वारंवार होतो, परंतु बालक न घाबरता हसते. याचे कारण काय? तर विश्वासच. आम्ही चांगले वागलो, तर देव आमचे कल्याण करेल, अशी श्रद्धा ठेवून एखादी व्यक्ती चांगले वागत असेल, तर त्यात चूक ते काय? देवावर अथवा संतांवर श्रद्धा ठेवल्याने एखाद्यास मनःशांती लाभत असेल तर त्याने का ठेवू नये?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com