शरीरातील Vitamin B12 ची कमतरता कशी ओळखाल ? जीभेच्या 'या' लक्षणांवरून ओळखा

शरीरात विटॅमिनची कमतरता झाल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागू शकतं.
Vitamin B12 deficiency and Solution to overcome Vitamin B12 deficiency
Vitamin B12 deficiency and Solution to overcome Vitamin B12 deficiencyesakal

मानवी शरीरात विटॅमिनची निर्मीती अत्यंत कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे शरीरातील विटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी विटॅमिनयुक्त पदार्थ आपण आहारात घेत असतो. विटॅमिन हा शरीरातील एक ऑरगॅनिक कपाऊंड (Organic Compound) आहे. आपल्या शरीरात विटॅमिनची आवश्यकता फार थोड्या प्रमाणात असते. वेगळेवेगळ्या प्रकारचे विटॅमिन आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतात. मात्र शरीरात विटॅमिनची कमतरता झाल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागू शकतं. (Vitamin B12 deficiency and Solution to overcome Vitamin B12 deficiency)

मात्र अनेकवेळा शरीरात विटॅमिनची कमी ओळखणं फार कठिण असतं. वेळेत तुम्हाला जर शरीरातील विटॅमिनच्या कमतरतेबद्दल कळलं तर तुम्ही गंभीर आजारांना सामोरे जाण्यापासून वाचू शकता. सर्व विटॅमिनप्रमाणे विटॅमिन B12 देखील शरीरासाठी आवश्यक आहे. हे विटॅमिन रेड ब्लड सेल्स आणि डीएनए निर्मितीसाठी तर गरजेचं आहेच पण त्याच बरोबर ब्रेन आणि नर्व सेल्सच्या विकासासाठी देखील या विटॅमिनची महत्वाची भूमिका असते. (Disease) मांस, अंडी आणि डेअरी प्रोडक्ट्समध्ये विटॅमिन B12 असते. शरीरात या विटॅमिनच्या कमतरतेने हार्ट प्रॉब्लम, इनफर्टिलिटी, थकावट, मसल्समध्ये कमजोरी आणि नर्व सिस्टिमशी जुडलेल्या समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. विशेष म्हणजे विटॅमिन B12 ची कमतरता असल्यास त्याची लक्षणं जीभेवर दिसू लागतात.

Vitamin B12 deficiency and Solution to overcome Vitamin B12 deficiency
पुरूषांसाठी Vitamins गरजेचे; कमरतेमुळे होऊ शकतात हे आजार

विटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे जीभेवर छाले (तोंड येणे) ही समस्या उद्भवते. जीभेवरील छाले काही काळानंतर आपोआपच बरे होतात मात्र त्याच्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला आंबट आणि तिखट गोष्टी खाणं टाळावं लागेल. तसेच फार्मसीमध्येही यावर अनेक औषधी उपलब्ध असतात.

विटॅमिन B12 कमतरतेची लक्षणे

तुमच्या शरीरात विटॅमिन B12 ची कमतरता असेल तर ही लक्षणे दिसू लागतील:

शरीरात उर्जा नसणे

मसल्स कमकुवत होणे

धूसर दिसणे

डिप्रेशन आणि कन्फ्यूजन यांसारख्या सायकॉलॉजिकल समस्या

बुद्धी कमजोर होणे, गोष्टी विसरणे

अशी भरून काढावी विटॅमिन B12 ची कमतरता

नॅशनल हेल्थ सर्विसनुसार (NHS) १९ ते ६४ वयोगटातील लोकांमध्ये रोज १.५ मायक्रोग्राम विटॅमिन B12ची आवश्यकता असते.

या गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात असते विटॅमिन B12

मीट

मासे

दूध

चीज

अंडे

याशिवाय विटॅमिन B12 च्या अनेक सप्लिमेंट्स देखील बाजारात उपलब्ध असतात. मात्र त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com