

Junk Food and Skin Damage: Health Risks You Shouldn’t Ignore
sakal
Acne and Junk Food : आज आधुनिक जीवनशैलीत फास्ट फूड हा तरुणांसाठी अविभाज्य भाग होत आहे. परंतु त्यामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य धोक्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. नियमितपणे जंक फूडचे सेवन केल्याने त्याचा त्वचेवर, केसांवर एकंदरित आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तारुण्यातच वृद्धत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू होत असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करीत आहे.
सध्या अनेक जण जंक फूडच्या आहारी गेले आहेत. नॅशनल फूड अँड टेस्टिंग एजन्सीनुसार, २०१९ मध्ये, जिथे फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांपर्यंत होती. तीच टक्केवारी २०२३ मध्ये ४० टक्क्यांपर्यंत वाढली. मात्र २०२६ मध्ये यात सरासरी दुप्पट वाढ झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयसीएमआर अहवालात आरोग्यतज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार जंक फूडचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे त्वचेवर थेट परिणाम होऊ शकतो.