Women at High Risk of Diabetes and Blood Pressure. Survey Reveals
sakal
बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, औद्योगिकरित्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या (अल्ट्रा प्रोसेस्ड फूड) अतिरिक्त सेवनामुळे समाजात उच्च रक्तदाब, मधुमेह आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शहरात नुकत्याच झालेल्या 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानाच्या माध्यमातून ३० वर्षे वयोगटावरील केलेल्या वैद्यकीय तपासणीत ४० टक्के महिलांना उच्च रक्तदाब; तर २२ टक्के महिलांना मधुमेहाचे निदान झाले.