

Health experts emphasize breast cancer awareness among young women — early detection can save lives.
Sakal
– डॉ. दिपाली गोंजारी, वरिष्ठ ब्रेस्ट ऑन्कोसर्जन, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे
पुणे : भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान केले जाते, आणि त्याहून चिंताजनक बाब म्हणजे हा आजार आता केवळ वृद्ध महिलांपुरता मर्यादित न राहता तीस ते चाळीस वयोगटातील तरुण महिलांमध्येही झपाट्याने वाढताना दिसत आहे. हा आजार अनेकदा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय शरीरात प्रवेश करतो आणि कळण्याच्या वेळी तो घट्ट मुळे रोवून बसलेला असतो. त्यामुळे महिलांनी आपल्या शरीरातील लहानसहान बदल ओळखणे, वेळोवेळी तपासणी करून घेणे आणि लवकर निदान करणे हे अत्यावश्यक ठरते.