

The ICMR 2025 report reveals a concerning rise in viral infections across India, highlighting a growing public health risk.
Health News Marathi: भारतीयांमधील विषाणूजन्य आजारांचे प्रमाण हे लक्षणीयरीत्या वाढत असल्याची धक्कादायक माहिती 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (आयसीएमआर) या संस्थेच्या अभ्यासातून पुढे आली आहे. वैद्यकीय अभ्यासकांनी यासाठी साडेचार लाख रुग्णांची तपासणी केली असता त्यातील ११.१ टक्के एवढ्या नमुन्यांमध्ये विषाणूंचे अस्तित्व आढळून आले आहे.
ज्यांच्या शरीरात हे विषाणू आढळून आले त्यांच्या आरोग्याला मोठा धोका असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जनआरोग्याला संसर्गजन्य आजारांचा नेमका किती धोका आहे? याची पडताळणी करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते.