

Kareena Kapoor’s Nutritionist Reveals the Smart Meal Plan for Easy Weight Loss
sakal
Rujuta Diwekar’s Simple Indian Diet Plan for Natural Fat Loss: आपल्याला निरोगी राहण्यासाठी, त्वचेच्या समस्या असतील, केसांच्या समस्या असतील, याव्यतिरिक्त शरीराच्या समस्या असतील तज्ज्ञ मंडळी किंवा घरातील वयोवृद्ध आपल्याला सर्वात आधी आपला आहार सुरळीत करायला सांगतात. याचाच अर्थ आपल्या आरोग्यासाठी आपला आहार अतिशय महत्त्वाचा आहे. पौष्टिक व संतुलित आहारामुळे शरीर तंदुरुस्त राहते, तर जंक फूड आणि जास्त तेलकट पदार्थांमुळे वजन वाढते आणि दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता असते.
पण आपण जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फिटनेसकडे बघतो तेव्हा आपल्यालाही त्यांच्या आहाराबद्दल जाणून घ्यायची फार उत्सुकता असते. त्यातही अभिनेत्री करीना कपूर खान ही नेहमीच तिच्या फिट आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी चर्चेत राहिली आहे. तिची आहारशैली हे दाखवते की फिट राहण्यासाठी उपासमार करण्याची गरज नाही, तर संतुलित आणि शाश्वत आहार घेणे महत्त्वाचे आहे.