चाळिशीनंतरचा सुरक्षित आणि शास्त्रशुद्ध व्यायाम!

चाळिशीनंतरही सुरक्षित आणि शास्त्रशुद्ध व्यायामामुळे हृदय, सहनशक्ती आणि मेटाबॉलिक आरोग्य सुधारता येते. योग्य तीव्रता व नियोजनामुळे दुखापतीचा धोका नाही.
Importance of Safe Exercise After 40

Importance of Safe Exercise After 40

Sakal

Updated on

डॉ. ऋतुपर्ण शिंदे

(हृदयरोगतज्ज्ञ)

मागील लेखामध्ये आपण हृदयविकारानंतरच्या व्यायामाविषयी माहिती घेतली होती. या लेखामध्ये आपण हृदयविकार नसेल पण वाढलेले वय, मधुमेह, रक्तदाब इत्यादी जोखीम घटक असतानाही सुरक्षित आणि शास्त्रशुद्ध व्यायाम कसा करावा याविषयी सखोल माहिती घेऊयात. रमेश, वय ४०, आयटी क्षेत्रात काम करणारा, अनेक वर्षांपासून नियंत्रणात नसलेला मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि सुरुवातीचे कोरोनरी आर्टरी डिसीज घेऊन जगत होता. डॉक्टरांनी त्याला व्यायाम सुरू करण्याचा सल्ला दिला; परंतु सुरक्षित पद्धतीने. रमेशच्या मनात भीती होती, ‘‘मी जास्त व्यायाम केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येईल का?’’ व्यायाम टाळण्याऐवजी त्याने व्यायामाची तीव्रता योग्य रीतीने कशी मोजायची हे शिकले. हृदयगती-झोन आणि स्मार्टवॉच यांचा वापर करून त्याने हळूहळू ताकद वाढवली. तीन महिन्यांत त्याची सहनशक्ती वाढली, रक्तदाब कमी झाला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याने व्यायाम सुरक्षितपणे केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com