Health-Wealth - चांगल्या झोपेसाठी...

उत्तम आरोग्यामधला झोप हा घटक अनेकदा दुर्लक्षित असतो.
sleep
sleep

उत्तम आरोग्यामधला झोप हा घटक अनेकदा दुर्लक्षित असतो. काही जण झोपेचे तास अनुत्पादक मानतात आणि चांगली झोप मिळण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, तर काही जण झोपेवर विलक्षण प्रेम करतात आणि झोपण्यात अनेक तास घालवतात. यापैकी कोणत्या तरी एका गटातल्या व्यक्ती तुम्हाला नक्कीच माहीत असतील.  

झोप आणि आपले फोन किंवा लॅपटॉप्समध्ये सापडणाऱ्या बॅटऱ्यांमध्ये काही साधर्म्य आहे. तुम्ही फोन बंद होईपर्यंत तो वापरत राहता की नाही? फोनच्या बॅटरीचे आयुष्य कमी करण्याचाच हा प्रकार. तशाच प्रकारे अनेक जण आपले शरीर अशा प्रकारे जागवत राहतात, की आता यापुढे जागे राहूच शकत नाही असे वाटल्यावरच झोपी जातात. मात्र, जेव्हा तुम्हाला खरेच झोप येते, तेव्हा किती तासांची झोप पुरी होते?

ही गोष्ट सगळ्यांसाठी सारखी नसते. शालेय विद्यार्थ्यांना ९ ते ११ तास झोप लागते. (ही मुले एवढी झोपली तर त्यांच्यावर फार रागवू नका.) किशोरवयीन मुलांसाठी ८ ते १० तास इतकी झोप योग्य असल्याचे सांगितले जाते. प्रौढांमध्ये झोप ७ ते ९ तास पुरेशी होते, तर ६५ वर्षांच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांना ७ ते ८ तास झोप योग्य असते.

तुम्हाला जर चांगली झोप मिळत नसेल आणि ही झोप सहा तासांच्या आत असेल, तर तुमच्या मेंदूतले निर्णय घेण्यासाठीच्या भागामध्ये बिघाड होतो. तुम्हाला वरवर वाटत असेल, की तुम्ही ठीक आहात; पण तुम्ही तसे नसता. लक्ष देण्यासाठी कारणीभूत असलेला ‘प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’ हा भाग दुर्बल होत असतो.

चांगली झोप मिळण्यासाठी कानमंत्र

रोज विशिष्ट वेळीच उठण्याचा प्रयत्न करा. जागे होण्यासाठी विशिष्ट वेळेवर भर द्या-कारण आपले शरीर म्हणजे एक गुंतागुंतीची प्लंबिंग यंत्रणा आहे. विशिष्ट वेळीच विशिष्ट द्रवनलिका खुल्या होतात आणि ज्यामुळे तुमची एकूण एनर्जी, मूड, पचन या सर्व गोष्टींवर परिणाम होत असतो. तुम्ही रोज विशिष्ट वेळी झोपेतून उठू लागल्याने शरीराला हार्मोन्सचे संतुलन करणे सोपे जाते. तुम्हाला इतर गोष्टी करण्यासाठी चांगल्या मूडचे वरदान मिळते. ही वेळ ठरवली, की तुमची झोपी जाण्याची वेळही निश्चित होईल.

चांगल्या झोपेसाठी तयारी करा. नुसते बेडरूममध्ये प्रवेश करून लगेच बेडवर आडवे पडू नका. शक्य असेल, तर पहिल्यांदा ती खोली शांत, अंधारी आणि गार करायचा प्रयत्न करा. चांगली झोप पाहिजे असेल, तर तुमच्या शरीराचे तापमान कमी व्हायला पाहिजे. एक युक्ती म्हणजे झोपण्यापूर्वी गरम पाण्याने स्नान करणे. त्याद्वारे तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान वाढवता-जे कमी होते आणि ज्यामुळे तुम्हाला झोपी जाण्यास सोपे होते.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा. डिजिटल स्क्रीनमुळे झोपेचे चक्र कसे बिघडते, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. इलेक्ट्रॉनिक उपकरणे तुमच्या विचारांना चालना देतात आणि तुम्हाला गुंतवून ठेवतात. तुम्ही टीव्ही बंद केला किंवा फोन बाजूला ठेवून दिला, तरी तुमचा मेंदू अशा प्रकारे गुंतून राहिल्याने झोप येणे अवघड असते. झोपी जाण्यापूर्वी किमान एक तास या उपकरणांपासून दूर राहा. तुमचे मनाचे प्रतिबिंब तुमच्या शरीरावर पडू दे-म्हणजे ही झोपण्याची वेळ आहे हे शरीराला कळेल.

झोप म्हणजे भान नसताना येणारी गोष्ट असता कामा नये, तर ती दिवसभरातली दगदग घालवण्यासाठी नियोजनपूर्वक करता येण्यासारखी गोष्ट झाली पाहिजे. झोप चांगली येण्यासाठी तुम्ही रोज व्यायाम करण्याचाही विचार करू शकता. रोज अगदी अर्धा तास नुसते चालणेही चालू शकते. त्यातून तुमच्या झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com