Weight loss : वजन घटवण्यासाठी सात्विक जेवण मदत करेल, त्यात काय अन् कसे खावे जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला सात्विन जेवण खात वजन कसे कमी करता येईल याबाबत काही टिप्स सांगणार आहोत
Weight loss
Weight lossesakal

Weight loss : जेव्हा वजन कमी करण्याचा विचार डोक्यात येतो तेव्हा डाएट, वर्कआउट, जीम या सगळ्या गोष्टी सर्वात आधी डोक्यात येतात. भरपूर वर्कआउट केल्यानंतर शरीराला एनर्जी देण्यासाठी बहुतांश न्यूट्रिशनिस्ट अंडे आणि मीट खाण्याचा सल्ला देतात. मात्र जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत त्यांनी मग काय खावे असा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा आज आम्ही तुम्हाला सात्विन जेवण खात वजन कसे कमी करता येईल याबाबत काही टिप्स सांगणार आहोत.

काय असतं सात्विक जेवण?

सात्विक जेवण हा संपूर्णपणे प्लांट बेस्ड डाएट असतो. सात्विक भोजनाने शरीरातील हार्मोन्स पूर्णपणे संतुलित करण्यास मदत होते. सात्विक भोजन पचवण्यासही सोपे असते.

वजन घटवण्यासाठी सात्विक जेवण

सात्विक जेवणात तेल आणि मसाल्यांचा वापर फार कमी केला जातो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा डाएट बेस्ट मानल्या जातो. डायटिशीयन लवनीत बत्राच्या मते, सात्विक जेवणात कच्च्या भाज्या, फळे आणि नट्स यांचा समावेश करण्यात येतो. या सगळ्या पदार्थांमध्ये फॅट फार कमी प्रमाणात असते. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यात या जेवणाची मदत होते. (Diet Plan)

Weight loss
Weight Loss Mistakes: झटपट वजन कमी करण्यात या चुका करताय? आत्ताच थांबा नाहीतर...

डियटिशीयनच्या मते सात्विक जेवणात फायबरची मात्र चांगली असल्याने पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले असल्याचे वाटते. ज्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा फूड आणि जंकफूडपासून दूर राहाता.

वजन घटवण्यासाठी सात्विक जेवणात काय काय खावे?

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही खालील गोष्टींचा समावेश सात्विक आहारात करू शकता. (Weight Loss)

Weight loss
Weight Loss Tips :चपाती कि भात? वजन कमी करायला काय खाणं बंद करावं

तृणधान्ये : तांदूळ, गहू आणि बार्ली

कडधान्ये : विविध प्रकारचे कडधान्ये, जसे की मूग डाळ, हरभरा, अरहर इ.

ताज्या भाज्या : पालक, फरसबी, लवके, झुचीनी, भोपळा (बटाटे, कांदे, लसूण वगळा).

ताजी फळे : केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब, द्राक्षे इ.

नट : कच्चे किंवा हलके भाजलेले काजू आणि बिया

दुग्धजन्य पदार्थ: ताजे ताक, ताजे दही, लोणी, तूप आणि दूध

तेल: खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल आणि तीळ तेल

मसाले: आले, दालचिनी, वेलची, एका जातीची बडीशेप, धणे आणि हळद

गोड: गूळ आणि मध

डायटिशियनच्या मते सात्विक जेवणात लसूण आले यांसारख्या मसालेदार पदार्थांचा वापर अगदीच कमी करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com