Weight Loss Mistakes: झटपट वजन कमी करण्यात या चुका करताय? आत्ताच थांबा नाहीतर...

वजन नियंत्रणात राहिल्याने अनेक रोगांचा धोका कमी होतो आणि तुमचे शरीर सुंदर दिसते
Weight Loss Mistakes
Weight Loss Mistakesesakal

Weight Loss Mistakes : आपलं वजन नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे आहे, आपले वजन कमी करणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे कारण, वजन नियंत्रणात राहिल्याने अनेक रोगांचा धोका कमी होतो आणि तुमचे शरीर सुंदर दिसते. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही झटपट वजन कमी करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात केली पाहिजे.

वजन कमी करण्याच्या काही पद्धती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरु शकतात, म्हणून, वजन कमी करण्यासाठी तुम्ही जी काही पद्धत अवलंबत आहात ती निरोगी आणि सुरक्षित आहे याची खात्री करणे नेहमीच महत्त्वाचे असते.

Weight Loss Mistakes
Weight Loss : वजन कमी केल्यास हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका होईल कमी

या लेखात, आपण अशा काही चुकांबद्दल वाचणार आहोत ज्या चुका वजन कमी करण्याच्या नावाखाली अनेक लोकं अगदीच साहजिकपणे करतात आणि यामुळे त्यांचेच नुकसान होते.

वजन कमी करण्याच्या या चुकांमुळे शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आजारी पडण्याचा धोकाही वाढू शकतो. म्हणूनच जर तुम्हीही या चुका करत असाल तर आजच त्या थांबवा.

Weight Loss Mistakes
Weight Loss केल्यानंतर दिसणारी ही लक्षणे आहेत निरोगीपणाचे संकेत

हे काम केल्याने वजन कमी होत नाही

१. वजन कमी करण्यासाठी उपासमार

वजन कमी करण्याची गरज भासू लागताच लोक खाणे-पिणे पूर्णपणे बंद करतात. ते कमी खायला लागतात किंवा उपाशी राहायला लागतात. पण, ही एक अत्यंत हानिकारक पद्धत आहे.

उपाशी राहून वजन कमी करणे हा एक अत्यंत हानिकारक मार्ग आहे. या व्यतिरिक्त, अशा प्रकारे वजन कमी केल्यानंतर, असे देखील होऊ शकते की काही काळानंतर तुमची भूक आणि वजन दोन्ही वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाढते.

Weight Loss Mistakes
Weight Loss Mantra : अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी रोज करा ही योगासनं, फरक जाणवेल

२. दररोज व्यायाम करत नाही

आळशीपणामुळे किंवा थकव्यामुळे अनेक वेळा लोक व्यायाम करत नाहीत किंवा जिममध्ये जात नाहीत, परंतु यामुळे त्यांच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. खरं तर, शारीरिक श्रमाच्या प्रक्रियेत वारंवार खंडित झाल्यामुळे, चयापचय देखील प्रभावित होते आणि लोकांचे वजन कमी होत नाही.

Weight Loss Mistakes
Weight loss Diet: कमी जेवूनही वजन कमी होत नाहिय? 'हे' आहे कारण

३. खूप व्यायाम करणे

काही लोकांना असे वाटते की ते जितके जास्त व्यायाम करतात किंवा जास्त वेळ व्यायाम करतात तितक्या लवकर त्यांचे वजन कमी होईल. पण, असे होणार नाही.

तज्ज्ञांच्या मते, जास्त वर्कआउट केल्याने वजन कमी होत नाही. परिणामी, स्नायू खराब होतात आणि शरीराला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणूनच, व्यायामानंतर पुरेशी विश्रांती घेणे महत्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com