Shahajibapu Patil : शहाजी बापूंनी केलेलं डाएट घातक? तज्ज्ञ सांगतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahajibapu Patil

Shahajibapu Patil : शहाजी बापूंनी केलेलं डाएट घातक? तज्ज्ञ सांगतात

Shahajibapu Patil Diet Plan : काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, सगळं एकदम ओके म्हणत अचानक प्रसिध्दी झोतात आलेले शाहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांनी चक्क आठ दिवसात ९ किलो वजन कमी केलं. त्यामुळे त्यांनी असं कोणतं डाएट केलं याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने करायची, यानंतर उकडलेल्या पालेभाज्या, कडधान्ये याचा नाश्ता ते करत. वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन क्रिया आणि व्यायाम करायचा, संध्याकाळी मेडिटेशन. असा त्यांचा दिनक्रम होता.

हेही वाचा: Shahaji Bapu Patil: आठ दिवसात केले नऊ किलो वजन कमी; कसं काय?

पण तज्ज्ञ म्हणतात असे झटपट वजन कमी करणे हे आरोग्यास घातक ठरू शकतं. याविषयी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आरोग्य तज्ज्ञ डॉ. मयुरा काळे म्हणाल्या, असं क्रॅश डाएट आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

हेही वाचा: MLA Shahaji Bapu Patil : आता बोलत बसायचं नाय, करुनच दाखवायचायं

जर तुमचं डाएट फारच असेल तर ते कमी करणं योग्यच असतं. पण ते टप्प्या टप्प्याने करावं. रोज ५०० कॅलरीज कमी करत वजन कमी केलं तर ते ठिक आहे. पण जर रोज ४००० कॅलरीजचे एकदम २००० कॅलरीजवर आणले तर ते घातक ठरू शकतं.

पण क्रॅश डाएटमध्ये खूप कमी खाऊन, नेहमीच्या अगदी निम्मे खाणं करूम कॅलरी इनटेक अगदी कमी करून वजन कमी केलं जातं. याचा विपरीत परिणाम तब्येतीवर होतो. शिवाय डाएट सोडल्यावर किंवा नियमितता न ठेवल्याने पुन्हा वजन वेगात वाढते.

त्यामुळे जर हेल्दी राहून वजन कमी करायचे असेल तर डाएट बरोबरच व्यायम हा महत्वाचा मुद्दा आहे. चालण, पोहणं, धावणं, एरोबिक, लवचिकता टिकवण्यासाठी योगासनं असे व्यायाम प्रकार आवश्यक आहेत. शिवाय जर मसल मास मधलं फॅट कमी करायचं असेल तर वेट ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. मसल्स स्ट्राँग होतात आणि फॅट पण बर्न होतात, असंही डॉ. काळे यांनी सांगितलं.