Heart Attack Deaths India: भारतात दररोज 175 लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू , एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक माहिती

एनसीआरबी अहवालात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूंच्या वाढीचा धक्कादायक खुलासा
sudden deaths NCRB,

sudden deaths NCRB,

Sakal

Updated on
Summary

राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात दररोज १७५ लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. २०१९ पासून अचानक मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली असून, २०२२ आणि २०२३ मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

daily heart attack fatalities statistics India NCRB: राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालातू धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१९ पासून अचानक मृत्यू आणि हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये २०२२ आणि २३ मध्ये सर्वाधिक वाढ झाली.

२०२२ मध्ये भारतात एकूण ५६,६५३ अचानक मृत्यूंपैकी ३२, ४१० मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहेत. तर २०२३ मध्ये ही संख्या ६३,६०९ एवढी झाली. यामध्ये ३५ हजार ६३७ मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले.

या प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि मेंदूतील रक्तस्राव यांचा समावेश होता. या अहवालात दोन श्रेणी केल्या आहेत. हृदयविकाराचा झटका आणि इतर. हृदयविकाराचा झटका या श्रेणीत अचानक मृत्यूंपैकी सुमारे ६० टक्के मृत्यू होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com