- डॉ. मालविका तांबेश्रावण महिना सुरू झाला की कोणालाही जेवताना बोलवताना तुमचा उपवास आहे का? असा प्रश्न भारतीय समाजात विचारणे क्रमप्राप्त आहे. मित्र परिवार भेटला की चाललेली चर्चा पाहिली तर आपल्याला दोन प्रकारच्या व्यक्ती दिसतात..चातुर्मासात उपासना करावी, उपवास करावा असा मत असणारा एक वर्ग असतो तर, आम्हाला उपास-तापास झेपत नाही, असे म्हणणारा दुसरा वर्ग असतो. उपवास केला की शरीरात पित्त वाढणे, ॲसिडिटी वाढणे, डोके दुखणे, उलट्या होणे असा त्रास होणारे खूप लोक आपल्याला दिसतात.परंतु खरे तर उपवास शरीर व मन या दोघांचीही ताकद वाढवायला मदत करतो, शरीरात असलेला सर्व ताप अर्थात त्रास कमी व्हायला मदत करतात, हे आपल्याला वेदशास्त्रानेही सांगितलेले आहे. तसेच नवीन येणारे सगळे संशोधनसुद्धा उपवासाला इंटरमिटंट फास्टिंग असे नाव देऊन त्याचे शरीरावर होणार चांगले परिणाम सिद्ध करत आहेत..उपवास केल्यानेशरीराची चयापचय क्रिया व्यवस्थित राहते.नवीन धातू तयार होतात.सगळ्या पेशींची कार्यप्रणाली सुधारते.ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो.कमी प्रमाणात अन्न खाल्ले गेल्याने शरीरातील चरबी कमी होत, पर्यायाने वजन आटोक्यात राहायला मदत मिळते.या सगळ्या सुधारणा झाल्यामुळे सगळ्या प्रकारच्या रोगांपासून संरक्षण व्हायला मदत मिळते.दीर्घायुष्य प्राप्त होते.आयुर्वेदानुसार लंघन अर्थात उपवास केल्याने शरीरातील आमाचे पचन होते.शरीराची शुद्धी होते.अग्नीचे कार्य व्यवस्थित चालते.त्रिदोष संतुलित होतात.शरीरातील सर्व स्रोतांचे कार्य व्यवस्थित होते.आयुर्वेद व आधुनिक शास्त्रांनुसार मेंदूची कार्यक्षमता व मनाचे स्थिरत्व वाढायला मदत मिळते..उपवास कसा करावा असा सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो. यासाठीव्यक्तीची इच्छाशक्ती.शिस्त पाळण्याची क्षमता.अन्न पचविण्याची क्षमता व प्रकृती.खाण्या-पिण्याच्या सवयी या सगळ्यांचा विचार करावा लागतो.पित्तप्रकृतीच्या व्यक्तीला सहसा कुठलाही उपवास सहन होत नाही.वातप्रकृतीच्या व्यक्तीला इच्छाशक्ती कमी असते व ते कुठलीही गोष्ट निश्र्चितपणे करू शकत नाहीत, त्यामुळे उपवासाचे नियम पाळणे त्यांना कठीण पडू शकते.कफप्रकृतीच्या व्यक्तीला मुळात अन्न पचविण्याची ताकद कमी दिलेली असते, त्यामुळे ते अधून मधून आपोआप लंघन करत असतात.सात्त्विक आहार घेणाऱ्यांना उपवास करणे सोपे जाते.तामसिक वा बाहेरचे अन्न खाण्याची सवय असणाऱ्यांना उपवास सहन होत नाही.त्यामुळे उपरोक्त चारीही गोष्टींचा विचार करून उपवास करावा की नाही हे ठरवावे..उपवास वेगवेगळ्या पद्धतींनी करता येऊ शकतो.काही लोक संपूर्ण दिवस काहीही खात नाहीत.काही लोक गरम पाणी, फळांचा रस, नारळाचे पाणी, सुका मेवा, फळ किंवा अमुक एक धान्य खाण्याचा नेम करतात.काही लोक सकाळी उपवासाचे पदार्थ घेऊन फक्त जेवतात.उपवास कशा प्रकारे करावा याचा निर्णयही चारीही गोष्टींचा विचार करून घ्यावा..उपवास किती दिवस करावा?या प्रश्नाचे उत्तर देताना माझा व्यक्तिगत सल्ला असा राहील की, आठवड्यातून एक दिवस किंवा एका संध्याकाळ उपवास प्रत्येकाने नक्की करावा.सलग फार दिवस उपवास करणे हे शरीराच्या चयापचय क्रियेसाठी कदाचित चुकीचे ठरू शकते..उपवास करणाऱ्या व्यक्तीनेआदल्या रात्री वेळेत झोपणे व व्यवस्थित जेवणे आवश्यक असते.उपवासाच्या दिवशी सकाळी वेळेत उठून स्नान, योगासने, प्राणायाम ही नित्यकर्मे करावीत.उपवासाच्या दिवशी आवडत असल्यास किंवा विश्र्वास असल्यास स्वतःच्या आराध्याची उपासना करावी, असे केल्याने उपवास सुसह्य होतो अशा अनेक जणांचा अनुभव आहे.आधी सांगितल्यानुसार उपवासाची मानसिक स्तरावरही मदत होते. उपवासाच्या दिवशी टीव्ही वा मोबाईल बघण्याऐवजी स्वास्थ्यसंगीत ऐकणे, एखादे चांगले पुस्तक वाचणे, मित्रपरिवाराशी गप्पा मारणे हे अधिक उचित ठरेल.उपवासाच्या दिवशी थोडा आराम करणे, फार प्रमाणात बाहेर फिरायला न जाणे, उन्हात न बसणे, फार वेळ वाहनात न बसणे या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या.अधिक प्रमाणात व्यायाम करणाऱ्यांनी, जिमला जाणाऱ्यांनी उपवासाच्या दिवशी या दोन्ही गोष्टी टाळलेल्याच बऱ्या.कुठलाही वाद-विवाद, चिडचिड, अप्रिय प्रसंगाबद्दल बोलणे वा त्याचा प्रत्यक्ष भाग होणे उपवासाच्या दिवशी टाळणेच श्रेयस्कर ठरते.पुढच्या भागात आपण उपवासात काय खाणे योग्य ठरेल हे पाहू..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.