सत्यं परं धीमहि

चेतना तरंग
pune
punesakal

सत्यं परं धीमहि – सत्य आणि अलौकिक दैवत्व यांची मला सर्वथा जाणीव आहे. आपली बुद्धीमत्ता या जगाला विभक्त करत असते आणि हीच बुद्धी जेव्हा दैवत्वात चिंब भिजते, तेव्हा ती या जगतास एकसंघ करू शकते. अरभाट आणि क्षुल्लक गोष्टींची वायफळ चर्चा करण्यात आपली बुद्धी गुंग होते, तेव्हा जग विभक्त होऊ लागते. उलट बुद्धीचा वापर ज्ञान, शहाणे विचार, सत्य आदींच्या चर्चेत होतो, तेव्हा ही सृष्टी एकरूप, एकसंघ होऊ लागते. त्यातून मग अलौकिकाचा साक्षात्कार घडतो. तशाने अद्वैत चैतन्याची ओळख पटते.

ही सृष्टी प्रवाही आहे. तुम्ही तक्रारीचे सूर आळवा, कवितांच्या ओळी लिहा अथवा ज्ञानोपासना करा, सर्वकाळ तुम्ही या सृष्टीच्या प्रवाहाचे साक्षीदार आहात. समजा कुणीतरी आपले गाऱ्हाणे सांगत आहे अथवा समर्थन करीत आहे. अशावेळी ते मनाला येईल ते फक्त बोलत असतात, सहजपणे. याचप्रमाणे तुम्ही जेव्हा ज्ञानचर्चा करता, तेव्हा तुमचे विचार उत्स्फूर्तपणे येत असतात. तुमची कवितासुद्धा उत्स्फूर्त झऱ्यासारखी वाहते. हा तुमच्या बुद्धीतून आलेला एक प्रवाहच असतो.

बुद्धीमधून असे काहीही वहात येत असते, मग ते ज्ञान असेल किंवा कचरा. तुम्ही त्या प्रवाहाचे साक्षी आहात. अशावेळी तुम्ही ईश्वराकडे केवळ प्रार्थना करू शकता. ‘‘जे माझ्या बुद्धीतून उत्स्फूर्त वहात आहे, ते फक्त सत्य असू दे, शहाणपणाचे असू दे, दैवी असू दे.’’

स्वाध्याय : तुमची स्वतःची नावे बाजूला ठेऊन द्या. तुमच्या सत्संगसमूहातील सर्वांसाठी केवळ एकच काहीतरी नाव ठरवून द्या. महिनाभर तेच नाव सर्वांनी वापरायचे. ख्रिस, मायकल, कृष्ण, हरी, कोणतेही एक नाव ठरवा.

प्रश्न : हा स्वाध्याय करून काय साधायचे आहे?

श्री श्री : तुमच्या अस्तित्वामध्ये तुमच्या नावाबरोबरची तुमची ओळख खूप खोलवर आहे आणि ती तुम्हाला घट्ट बांधलेली असते. जेव्हा तुम्ही आपल्या नावाचे बंधन झुगारून द्याल, तेव्हा मुक्तीची अनुभूती येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com