Soup For Sinus In Winter : हिवाळ्यात तुम्हालाही होतो सायनसचा त्रास? ट्राय करा हे सूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sinus In Winter

Soup For Sinus In Winter : हिवाळ्यात तुम्हालाही होतो सायनसचा त्रास? ट्राय करा हे सूप

Sinus Home Remedy : हिवाळ्याची सुरूवात झाली आहे. वातावरणात गारवा निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शरीर उबदार रहावं म्हणून अनेकजण आपल्याला स्वेटर घातलेला दिसून येतात.

हेही वाचा: Health Tips: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का? ताबडतोब करा हे उपाय

मात्र, येवढं सर्व घालूनही किंवा योग्य ती काळजी घेऊनही अनेकांना थंडीचा त्रास होतो. यामध्ये सायनसचा त्रास काहींना हमखास होता. हा त्रास सुरू झाला की अनेकांना बेचैन व्हायला होतं.

हेही वाचा: Diabetes Patients Food: डायबिटीज पेशंट्सनी बटाटा खावा की नाही? वाचा रिसर्चर्सचा सल्ला

सायनमुळे अनेकांना सर्दी, डोकेदुखी आणि वारंवार शिंका येणे तर, काहीजण डोळे दुखण्याची तक्रारदेखील करतात. सायनसमुळे कपाळावर ताण येतो. जर तुम्हालादेखील सायनसचा त्रास असेल तर, डॉक्टारांच्या सल्ल्यासोबत तुम्ही घरच्या घरी एक टिप फॉलो करू शकता. यामुळे तुमचा सायनसचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

हेही वाचा: Winter 2022: हिवाळ्यात लवंगाचा चहा का प्यावा?

हे सूप ठरेल फायदेशीर

थंडीत होणारा त्रास कमी करण्यासाठी घरच्या घरी तुम्ही एक सूप तयार करू शकता. हे सूप सेवन केल्याने शरीर उबदार राहण्यास मदत होते. यामुळे घसा खवखवणे, सायनसची समस्या दूर होते.

हेही वाचा: Morning Health Care Tips: सगळे आजार पळतील दूर; फक्त सकाळी उठून करा हा उपाय

सूपसाठीचे साहित्य

  • फुलकोबी मध्यम आकाराचा - २ ते ३ बारीक चिरून घ्यावा.

  • कांदा - २

  • बारीक चिरलेले आले - १ टीस्पून

  • ठेचलेली काळी मिरी - 2 ते 3 टीस्पून

  • हिरवी वेलची - २

  • लवंग - 2

  • चवीनुसार मीठ

हेही वाचा: Health Tips : आयुर्वेदीक काढा पिणे आरोग्यासाठी धोकादायक? या आजारांना मिळते आमंत्रण

असे बनाव सूप

सूप बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सर्व मसाले टाका. यानंतर त्यात चिरलेला कोबी शिजवून घ्या. जोपर्यंत ते सूपासारखे दिसून येत नाही. तोपर्यंत ते मंद आचेवर शिजू द्या.

हेही वाचा: Winter Drinks : कडाक्याची थंडी पळवायची आहे; ट्राय करा हे 5 ड्रिंक्स

हे आहेत सूप पिण्याचे फायदे

कोबीपासून तयार केलेले हे सूप केवळ सायनसचा त्रास कमी करते असे नाही. तर, पोटाच्या समस्यादेखील दूर करण्यासाठी प्रभावी आहे. याच्या नियमित सेवनामुळे शरीरातून अतिरिक्त फ्लुएड्स बाहेर पडते.

हेही वाचा: हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी बनवा पौष्टिक सुप ; जाणून घ्या रेसीपी

या सूपात असलेले आले सर्दी, खोकला, सायनस आणि ब्रोन्कियल इन्फेक्शनपासून संरक्षण करते. याशिवाय आल्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स जळजळ होण्यापासून आराम देतात. तसेच सूज आणि वेदना यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे सूप बनवण्यासाठी वापरण्यात येणारे घटक जरी सहज उपलब्ध असले तरी, अनेकांना त्याची ऍलर्जी असू शकते. त्यामुळे कोणताही नवी पदार्थ खाण्यापूर्वी एकदा अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.