Winter Drinks : कडाक्याची थंडी पळवायची आहे; ट्राय करा हे 5 ड्रिंक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Drinks

Winter Drinks : कडाक्याची थंडी पळवायची आहे; ट्राय करा हे 5 ड्रिंक्स

Healthy Drinks for Winter : पावसाळा संपून वातावरणात थंडीची चाहून सुरू झाली आहे. अनेकांसाठी हा सीझन आनंददायी असा असतो. थंडी हा असा ऋतू आहे, ज्यामध्ये आपण विविध प्रकारचे अन्न ग्रहण करू शकतो.

हेही वाचा: Winter Skin Care : थंडीत चेहऱ्यावर लावा 'या' ५ गोष्टी, स्कीन बनेल मऊ अन् सुंदर

Winter

Winter

थंडीत अनेकजण विविध हेल्दी पेयांचाही आहारात समावेश करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच पाय पेयांबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यांचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे मिळण्यास मदत होईल.

1. मसाला चहा

मसाले तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. मसाल्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे शरिररातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मसाल्याचा चहाचे सेवन करू शकता. यामुळे तुमचे शरीर थंडीत (Winter Session) उबदार राहण्यास नक्कीच मदत होईल.

2. हॉट चॉकलेट

थंड वातावरणात प्रत्येकाला गरम पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळे जर तुम्हालाही अधिक प्रमाणात थंडी वाजत असेल तर, तुम्ही हॉट चॉकलेट पिऊ शकता. यामुळे मूड स्विंग्स नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हेही वाचा: Health: महिलांना लवकर थंडी वाजते की पुरुषांना? नक्की खरं काय?

Milk Drinking

Milk Drinking

3. बदाम दूध

बदाम दूध स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेय आहे, हिवाळ्यात याचे सेवन केल्याने कॅल्शियमचे गुण आणि बदामाची स्वादिष्ट चव या दोन्हींचा अनुभव घेऊ शकता.

4. गरम पाण्यात मध आणि हळदीचे मिश्रण

गरम पाण्यात मध आणि हळद टाकून मिश्रण टाकलेले पाणी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळद आणि मध यांचे मिश्रण शरीराची इम्यूनिटी वाढवण्यास मदत करते, यामुळे तुमची त्वचा चमकदार राहण्यास मदत होते. तसेच थकवा दूर करते. त्यामुळे हे पेय तुम्हाला हिवाळ्यात नक्कीच उबदार आणि आरामदायी ठेवेल.

हेही वाचा: Winter Two-Wheeler Care: कडाक्याच्या थंडीत रोज बाइकचा प्रवास होतोय? अशी घ्या बाईकची काळजी

5. केशर दूध

केशरचे दूध विशेषतः थंडीच्या दिवसात प्यायले जाते. केशर त्याच्या स्वादिष्ट चवीसाठी ओळखले जाते आणि ते अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असेच आहे. त्यामुळे केशर दूधाचे सेवन करणे थंडीत तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. केशर दूधाची चव अधिक वाढवायची असेल तर, तुम्ही यामध्ये इतरही हेल्दी नट्स टाकू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. कोणत्याही पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी एकदा अवश्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.