अंथरुणातून उठण्यापूर्वी थोडा वेळ खाटेवर बसावे

मेंदुरोग तज्ज्ञांचे निरीक्षण :ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनची मोठी जोखीम
Sit on bed for a while before getting out of bed Psychiatrist observation
Sit on bed for a while before getting out of bed Psychiatrist observation

नागपूर - पाठदुखी, मानदुखी, मूत्राशय आणि आतड्यांचे बिघडलेले कार्य तसेच लैंगिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. या समस्यांकडे गंभीरतेने बघावे. या समस्यांमुळे शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होते. तसेच वेदना, भीती आणि चिंता सतावत असते. तर रक्तवाहिन्यांतील द्रवपदार्थाचा अभावामळे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनची मोठी जोखीम आहे. रक्तवाहिन्यांमधील लाल रक्तपेशींची संख्या कमी होते, यामुळे रक्तभिसरण योग्य होत नाही. यामुळे अंथरुणातून उठताना जोखीम असल्याने अंथरुणातून उठण्यापूर्वी थोडा वेळ खाटेवर बसावे असे मत लंडन येथील न्युरोलॉजिस्ट डॉ. एलेन मेरेटे हेगन यांनी व्यक्त केले.

न्युरोलॉजिस्ट आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीतर्फे जागतिक स्तरावर मेंदुरोगावर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. एलेन हेगन यांनी वरील विषयावर मत व्यक्त करताना ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनची अधिक जोखीम असल्याचे सांगितले.

न्युरोलॉजिस्ट आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोलॉजीचे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी बैठी जीवनशैली, कामाचा ताण, तणाव, उठण्या बसण्याच्या अयोग्य पद्धती, आघात ही विविध वेदनादायक अस्वस्थतेची मुख्य कारणे असल्याचे सांगून जागतिक पातळीवर ऑनलाइन चर्चेला सुरुवात केली.

न्यूरोलॉजिस्ट डॉ. एलेन मेरेटे हेगन यांच्यासह मुंबईचे न्युरो रिहॅब सेंटरचे डॉ. अभिषेक श्रीवास्तव, दिल्लीचे डॉ. मनमोहन मेहंदीरत्ता, ओरिसा एमकेजी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. सौम्या दर्शन नायर सहभागी झाले होते.

ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनची लक्षणे

  • उभे राहिल्यानंतर चक्कर येणे

  • धूसर दृष्टी

  • अशक्तपणा

  • बेहोशी

  • गोंधळ

  • मळमळ

  • लघवीचे प्रमाण कमी होणे

हे करावे

मिठाच्या पदार्थांचे प्रमाणात सेवन करणे

पाणी पिण्याची योग्य सवय

ठराविक अंतराने थोडे थोडे खाणे

नियमित व्यायाम करावा

हे टाळावे

गरम वातावरणात व्यायाम करणे

जास्त वेळ पाय वाकवून बसू नका

मद्यपान करणे टाळा

ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनवर रुग्णाशी डॉक्टरांनी सविस्तर चर्चा करावी. या आजारामुळे रुग्ण वेदनांसह त्रास सहन करत असतो. या आजारामुळे उच्च बद्धकोष्ठता होते. रक्तदाबात चढउतार होते. आहारातील बदल, जीवनशैलीत बदल, द्रवपदार्थाचे वन, भरपूर फायबरयुक्त अन्न सेवन, विरघळणारे तंतूचा वापर आहारात असावा. मेंदूविकाराच्या ६० ते ७०टक्के रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता दिसून येते.

- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, न्यूरोलॉजिस्ट.

ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन ६५ आणि त्याहून अधिक वयाच्या जेष्ठ लोकांमध्ये सामान्य आहे. हृदयाच्या आणि मानेच्या धमन्यांमध्ये रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या विशेष पेशी असतात. वयानुसार हे कमी होऊ शकतात.

उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाणाऱ्या औषधांच्या परिणामातूनही ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनची जोखीम आहे.

- डॉ. एलेन मेरेटे हेगन, न्यूरोलॉजिस्ट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com