Sleep Problems : साखरझोपेचे गणित बिघडू देऊ नका

Sleep Problems : सुखाची झोप साऱ्यांनाच हवी असते. परंतु जीवन धकाधकीचे झाले आहे. ताणतणाव वाढले आणि निसर्गाने दिलेल्या झोपेच्या देणगीला नजर लागली.
Sleep Problems
Sleep Problems esakal

Sleep Problems : सुखाची झोप साऱ्यांनाच हवी असते. परंतु जीवन धकाधकीचे झाले आहे. ताणतणाव वाढले आणि निसर्गाने दिलेल्या झोपेच्या देणगीला नजर लागली. मानवातल्या महत्त्वाकांक्षेने ‘झेप’ घेतली आणि ‘झोप’ उडवली. आठ तासांची शांत झोप आता बहुतेकांच्या नशिबी राहिलेली नाही. पहाटेच्या प्रहरी चार स्थितीत प्रत्येकी २० मिनिटांची साखर झोप असते. हे साखर झोपेचे गणित कोलमडले तर झोपेच्या विविध आजारांना नकळत निमंत्रण मिळाले.

झोपेच्या गणितानुसार मानवाच्या आयुष्यातील ३३ टक्के वेळ झोपण्यात जातो. मात्र अलीकडे स्मार्ट फोनमुळे चिमुकल्यांपासून तर ज्येष्ठांची झोप उडाली. यामुळे कोणी कधी झोपेतच चालतो. तर कोणाचा मेंदू झोपेत जागा होतो. तो चालू लागतो. झोपेच्या आजाराच्या विळख्यात अडकल्यानंतरही त्याकडे गंभीरतेने बघत नसल्याची खंत झोपविकार तज्ज्ञ डॉ सुशांत मेश्राम यांनी व्यक्त केली.

Sleep Problems
Monsoon Health Care : आला पावसाळा, तब्येतीला सांभाळा.! संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या आरोग्याची काळजी

सुखाच्या झोपेचे गणित

  • झोपेत व्यक्तीचा मेंदू चार प्रकारच्या स्थितींमधून प्रवास करीत असतो.

  • डोळ्यांची हालचाल न होता ४ झोपेच्या स्थिती असतात.

  • चार पैकी प्रत्येक स्थितीत ७० मिनिटांची झोप असून याला ‘नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप’ म्हणतात.

  • डोळ्यांच्या हालचालींसोबत होणारी झोप २० मिनिटांची असते.

होणारे आजार

  • झोपेत श्‍वास थांबणे

  • झोपेत फिट येणे

  • काही काळासाठी स्मृतिभ्रंश

  • विसरभोळेपणा

  • दिवसा थकल्यासारखे वाटणे

  • झोपेतून उठताना थकवा जाणवणे

  • झोपेत लघवी करणे

Sleep Problems
Health Care : तरुणांमध्ये गुडघेदुखीचे वाढले प्रमाण; बैठी जीवनशैली, चुकीचा आहार कारणीभूत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com