Sleep Process
sakal
- डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन
आपण आयुष्याचा जवळपास एकतृतीयांश वेळ झोपेत घालवतो. तरीही पाठदुखीच्या उपचारांमध्ये झोपेची पद्धत सर्वांत जास्त दुर्लक्षित राहते. अनेक रुग्ण सांगतात, ‘दिवसभर ठीक असतं; पण सकाळी उठताना पाठ, मान आखडलेली असते.’ यामागे बहुतांश वेळा कारण असतं - चुकीचं स्लीपिंग पोश्चर.
झोप ही शरीरासाठी केवळ विश्रांती नसून कणा, स्नायू आणि डिस्क यांच्या पुनर्बांधणीची वेळ असते. या वेळेत कणा चुकीच्या स्थितीत राहिला, तर वेदना वाढणं अपरिहार्य ठरतं.