Sleep Talking : झोपेत बोलण्याची सवय विनोद नव्हे, असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sleep Talking

Sleep Talking : झोपेत बोलण्याची सवय विनोद नव्हे, असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण

Sleep Talking : तुमच्या कुटुंबातील एखाद्याचा झोपेत बडबडण्याचा किस्सा तुम्ही लहानपणी कोणाकडून तरी ऐकलाच असेल. मात्र हा विनोदाचा भाग आहे. मात्र हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं याची कल्पना तुम्हाला आहे काय? आणि हे का होतं हे तुम्हाला माहितीये का? याचा नेमका कुठल्या आजाराशी संबंध आहे ते आपण जाणून घेऊयात.

स्टडीमध्ये असे दिसून आले की, 3 पैकी 2 लोक झोपेत बडबडतात. स्लीप टॉकिंग हा एक प्रकारचा पॅरासोम्निया आहे. हा एक झोपेचा विकार आहे. यात एखादा व्यक्ती झोपेत विचित्र वागतो किंवा बोलतो. द सनच्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञ स्नोर्बाक म्हणतात की, झोपेत बोलण्यात काहीही नुकसान नाही. पण हे निश्चितपणे आरोग्याशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते.

हेही वाचा: Night Sleep : तुम्हीही रात्री स्वेटर घालून झोपता का? ही सवय आजच सोडा, नाहीतर

झोपेत माणसं का बोलतात?

झोपेत बोलणे हे सामान्य आहे की यामागे काही कारण असू शकतं याचा शोध घेणे फार गरजेचे आहे. झोपेत उद्भवणारे अडथळे देखील यास कारणीभूत असू शकतात. खोलीचे तापमान, प्रखर प्रकाश या गोष्टीही यास कारणीभूत असू शकतात. तज्ज्ञ म्हणातात की, स्लीप टॉकिंग घटकांमध्ये तणाव, झोपेचा अभाव आणि मद्यपान यांचा समावेश असू शकतो. मानसिक आरोग्य खोळंबल्याचा प्रभाव देखील झोपेत बोलण्यास जबाबदार असू शकते.

अशात तज्ज्ञांची मदत घ्यावी का?

झोपेत बोलणे हे सामान्य असू शकतं. मात्र यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर फरक पडत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

टॅग्स :expertsdoctorSleep health