Winter Season : थंडीत तोंडावर पांघरूण घेऊन झोपल्याने हार्टअ‍ॅकचा धोका, वेळीच व्हा सावध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Season

Winter Season : थंडीत तोंडावर पांघरूण घेऊन झोपल्याने हार्टअ‍ॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

Sleep With Overhead Blancket : देशभरात थंडी वाढत आहे. थंडीत उब मिळावी म्हणून लोक ब्लँकेट, स्वेटर वापरतात. तुम्ही बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की, लोक थंडीत उब मिळावी म्हणून तोंडावर पांघरून झोपतात. तर काही लोक स्वतःला एवढे गुंडाळून घेतात की, बाहेरची हवाच आत येऊ नये आणि शरीर उबदार रहावं.

Heartattack

Heartattack

हार्टअ‍ॅकचा मोठा धोका

या सवयी आरोग्यासाठी फारच धोकादायक आहेत. यामुळे हार्टअ‍ॅक येण्याचा मोठा धोका असतो. तोंड आणि शरीराला पुर्ण झाकल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशात अस्थमा किंवा श्वसनाची समस्या असणाऱ्या लोकांसाठी हे धोकादायक आहे. यामुळे हार्टअ‍ॅक पण होऊ शकतो.

हेही वाचा: Sleep: वयानुसार किती तासांची झोप घ्यावी?

alzheimer

alzheimer

मानसिक आजारांची शक्याता

पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने आणि ओव्हरहिटींगमुळे डोकेदूखी, झोप न येणे, मळमळणे, थकवा असे त्रास सुरू होतात. काही संशोधनांमध्ये हे समोर आलं आहे की, यामुळे मानसिक आजार होऊ शकतात. यामुळे अल्जाइमर (विसराळूपणा) किंवा डिमेंशियासारखे आजार होऊ शकतात.

हेही वाचा: Sleep: तुम्हालाही गुडघे वर करुन झोपायची सवय आहे? आताच बदला नाहीतर...

वाढू शकतं वजन

ज्यांना स्लीप एप्नियाची समस्या आहे, त्यांना श्वास घेणं कठीण होतं. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि वजन वाढतं.