Sleep: वयानुसार किती तासांची झोप घ्यावी?

तुमच्या वयानुसार तुम्ही किती तास झोपावं? जाणून घ्या.
Sleeping
Sleeping sakal

उत्तम आरोग्यासाठी झोप ही आवश्यक आहे. उत्तम झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. झोपेसाठी माणूस वाट्टेल ते करतो पण अनेकदा बदलत्या लाईफस्टाईलमुळे झोप होत नाही आणि याचा परिणाम आपल्या दैनंदि आयुष्यावर होतो.

तुम्हाला माहिती आहे का वयानुसार आपण किती झोपायला हवं. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

वयानुसार किती तासांची झोप घ्यावी? 

  1. 6 ते 9 वयाच्या मुलांसाठी 9 ते 11 तासांचा झोप

  2. 12 ते 16 वयाच्या मुलांसाठी 8 ते 10 तासांची झोप

  3. 18 ते 64 वयाच्या व्यक्तींसाठी 7 ते 9 तास

  4. 65 वर्षांवरील वृद्धांसाठी 7 ते 8 तास झोप

Sleeping
Sleep: तुम्हालाही गुडघे वर करुन झोपायची सवय आहे? आताच बदला नाहीतर...

हि काळजी घ्या -

  • साधारणत: रात्रीची झोप ही आरोग्यासाठी उत्तम असते. रात्री 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे.

  • रात्री झोपण्यापूर्वी चहा आणि कॉफीचं सेवन चुकूनही करू नये. कॅफिनसारख्या उत्तेजक घटकामुळे तुमची झोप मोडू शकते.

  • हेल्दी आहार घ्या. कमी खा आणि झोपण्यापूर्वी तीन चार तास आधी खा अन्यथा अपचनाचा त्रासामुळे तुमची झोप बिघडू शकते.

  • शक्यतो रात्री व्यायाम करणे टाळावा. तुम्हाला निद्रानाशची समस्या निर्माण होऊ शकते. झोपण्याआधी तीन चार तास आधी तुम्ही व्यायाम करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com