Stomach pains ayurveda
sakal
प्रश्न - मला लहानपणापासून तिखट जेवण खूप मनापासून आवडते; पण सध्या तिखट खाल्लं की पोटात प्रचंड आग होते. कधी कधी घशातसुद्धा एकदम जळजळ झाल्यासारखी जाणवते. भूक फार उत्तम आहे. पोट पण साफ होतं; पण कुठल्याही एन्टासिड्स इत्यादीचा फरक पडत नाही. कृपया उपाय सुचवावा.
- श्री. नारायण जोशी, मुंबई.
उत्तर - फार अतिप्रमाणात तिखट खाल्याने, रात्री जागरण केल्याने किंवा फार जास्त प्रमाणात बाहेरचे किंवा आंबवलेले अन्न खाल्ल्याने पचन संस्थेमध्ये उष्णता वाढते आणि त्यानंतर अशा प्रकारचे त्रास दिसायला लागतात. काही दिवस पूर्णपणे सात्विक जेवण घेणे हे तिच्याकरिता उत्तम राहील. सकाळच्या जेवणामध्ये बिना मिरची किंवा अगदी कमीत कमी मिरची घालून मुगाची डाळ किंवा कढण, मऊ भात, ज्वारीची भाकरी, तूप जिऱ्याची फोडणी केलेल्या भाज्या जास्त उत्तम राहतील. पालेभाज्या व कडधान्यांचे प्रमाण कमी ठेवावे. सकाळी न्याहारीत शक्यतो साळीच्या लाह्या थोड्याशा दुधाबरोबर शतानंत कल्प घालून घ्याव्या. तसेच न्याहारी व दोन्ही जेवणानंतर संतुलन अविपत्तीकर चूर्ण एक चमचा पाण्याबरोबर घ्यावे. रात्री झोपताना एक चमचा सेनकुल चूर्ण घेणे उत्तम राहील. तसेच सकाळ संध्याकाळ संतुलन पित्तशांती गोळ्या, संतुलन प्रवाळ पंचामृत मोती युक्त गोळ्या घेण्याचासुद्धा फायदा होऊ शकेल. जमत असल्यास, सकाळी अनशापोटी संतुलन गुलकंद स्पेशल प्रवाळ युक्त घेणे चांगले राहील. हे सगळं करूनदेखील एक दोन महिन्यांत फरक नाही पडल्यास संतुलन पंचकर्म करून शरीराची शुद्धी करवून घेणं जास्त सयुक्तिक ठरेल.