लाईव्ह न्यूज

Spirulina Benefits : डायबिटीज, हृदयविकाराच्या रूग्णांनी खावे शेवाळ? जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे

स्पिरुलिना खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शियम, कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात
Spirulina Benefits
Spirulina Benefitsesakal
Updated on: 

Spirulina Benefits : मधुमेह आणि हृदयविकार हे दोन्ही गुंतागुंतीचे आजार आहेत आणि त्यांचा एकमेकांशी खोल संबंध आहे. तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल की ज्यांना मधुमेह आहे त्यांना हृदयविकाराचा सामना करावा लागतो. मधुमेह आता सगळ्यांना माहित असलेला आजार झालाय. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच.

खूप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार दिसत नाही. आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. त्यातल्या त्यात डायबिटीज टाइप-1 आणि डायबिटीज टाइप-2 या श्रेणीतील रुग्ण तर झपाट्याने वाढत आहेत.

जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारत ओळखला जातो हि एक खेदाची गोष्ट आहे. पूर्वी मधुमेह म्हटला कि लोकं घाबरून जायचे, आताही घाबरतातच पण त्यामानाने आता बऱ्यापैकी जागरुकता निर्माण झाली आहे. 

Spirulina Benefits
Diabetes: मधुमेहाचा सेक्स लाईफवर होऊ शकतो गंभीर परिणाम; पुरूषांना नपुंसकत्वाचा धोका

अशा या गंभीर आजारात एक वनस्पती तुमची मदत करू शकेल. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की अशा परिस्थितीत स्पिरुलीनाचे म्हणजेच शेवाळाचे सेवन केले पाहिजे. शेवाळ ही पाण्यात आढळणारी एक वनस्पती आहे जी सहसा धबधबे आणि तलावांमध्ये वाढते. आता तुम्ही म्हणाल की ही वनस्पती कशी खायची आणि त्याने खरचं फायदा होतो का?

शेवाळामध्ये पोषक घटक आढळतात

मायक्रोअल्गी म्हणजे शेवाळाचे शेकडो प्रकार आहेत. मात्र, मायक्रोअल्गीचा क्लोरेला आणि सायनोबॅक्टेरियाचा स्पिरुलिना हे दोन प्रकार फूड सप्लिमेंट म्हणून प्रामुख्याने वापरले जातात. स्पिरुलिनामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. या वनस्पतीच्या 60 टक्के भागांमध्ये प्रथिने असतात आणि इतर अनेक प्रकारचे आवश्यक अमीनो ऍसिड देखील आढळतात.

याशिवाय स्पिरुलिना खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शियम, कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. यामुळेच याला सुपरफूडच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. ते आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते ते पाहूया.

Spirulina Benefits
Diabetes Remedy : मधुमेहावर रामबाण उपाय बिहारची फेमस डिश! बिनधास्त खा

शेवाळामध्ये चव, रंग, वास आणि महत्त्वाचं म्हणजे सुपरफुड म्हणून असणाऱ्या गुणधर्म  काही त्रुटी असल्या तरी भविष्यासाठी याचा फायदा आहे.  वाढणारी लोकसंख्या आणि कमी होणारी शेतजमीन हे भविष्यातील एक मोठं आव्हान असणार आहे. अशावेळी खाद्यान्न उत्पादन वाढीसाठीचे नवे पर्याय शोधावे लागणार आहेत.

प्रथिनांच्या इतर स्रोतांप्रमाणे शेवाळ उगवण्यासाठी उत्तम दर्जाच्या शेतजमिनीची गरज नाही.सर्व प्रकारच्या जागेवर स्पिरुलिनाचं उत्पादन घेता येतं. पाण्यात, समुद्रात, तळ्यात, तलावात अगदी कुठेही. घराच्या अंगणात किंवा बर्फातसुद्धा ते उगवते.

शेवाळ हाय प्रोटीन पदार्थ आहे. म्हणजे यात प्रथिनाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असणाऱ्या वेगन आहारशैलीच्या लोकांसाठी प्रोटीन मिळवण्याचा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अंड्यातील पिवळ्या बलकाप्रमाणेच स्पिरुलिनाला घुसळल्यावर त्यातील कण उघडले जातात आणि यामुळे न मिसळणाऱ्या दोन द्रव पदार्थांना मिसळण्याचं काम ते करतात.

Spirulina Benefits
Diabetes: मधुमेहाचा सेक्स लाईफवर होऊ शकतो गंभीर परिणाम; पुरूषांना नपुंसकत्वाचा धोका

स्पिरुलिना खाण्याचे फायदे

मधुमेहामध्ये फायदेशीर

ज्यांना मधुमेह आहे त्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, स्पिरुलिना खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेही अनेक समस्यांपासून वाचतात. तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा आजार आहे त्यांनी या वनस्पतीचे सेवन करावे.

हृदयरोग प्रतिबंधक

स्पिरुलिना खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे बीपी नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीज सारखे हृदयविकार होऊ शकतात. स्पिरुलीनाचे सेवन सतत केल्यास रक्तप्रवाह चांगला राहतो.

वजन कमी करण्यात प्रभावी

ज्यांचे वजन सतत वाढत आहे त्यांनी स्पिरुलिना सेवन करणे आवश्यक आहे. यामध्ये बीटा कॅरोटीन, फॅटी अॅसिड, क्लोरोफिल आणि इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात, जे कंबर आणि पोटाभोवतीची चरबी कमी करण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com