
Successful Surgery on Trigeminal Neuralgia
sakal
थोडक्यात:
ठाण्यातील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियावर दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्ण वेदनामुक्त झाले आणि पुन्हा हसू, खाऊ व बोलू शकतात.
हा दुर्मिळ पण अतिशय वेदनादायक आजार “सुसाईड डिसीज” म्हणूनही ओळखला जातो.
Thane Hospital Facial Reconstruction Surgery: चेहऱ्यावरील तीव्र आणि असह्य वेदनांनी हैराण करणाऱ्या ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या आजारावर ठाण्यातील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. चंद्रनाथ तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांनी वेदनामुक्त जीवनास सुरुवात केली असून, आता ते पुन्हा हसू, खाऊ आणि बोलू शकतात. हा दुर्मिळ पण अतिशय वेदनादायक आजार असून, तो “सुसाईड डिसीज” म्हणूनही ओळखला जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.