Suhana Sakal Swasthyam 2023 : ‘हॅपिनेस कोशंट’ महत्त्वाचा!

माझ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यामागचा मंत्र आहे शिस्त. तुम्ही करत असलेल्या योगा, ध्यान, व्यायाम यामध्ये एक शिस्त आणि सातत्य असले पाहिजे.
suhana sakal swasthyam 2023 happiness quotient interview of most beautiful and fit actress madhuri dixit nene
suhana sakal swasthyam 2023 happiness quotient interview of most beautiful and fit actress madhuri dixit nenesakal

तुम्ही व्यवस्थित, हेल्दी जेवताय, थोडा व्यायाम करताय, थोडं मेडिटेशन करताय, तर आयुष्यात आनंद निर्माण होतो. ‘हॅपिनेस कोशंट’ चांगला असल्यावर आपण सर्वच गोष्टी आनंदानं करतो. सर्व कुटुंब आनंदानं राहतं. त्यातून जो आध्यात्मिक आनंद मिळतो तोही महत्त्वाचा आहे!

- माधुरी दीक्षित-नेने, प्रसिद्ध अभिनेत्री

तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यामागचा मंत्र काय?

माझ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यामागचा मंत्र आहे शिस्त. तुम्ही करत असलेल्या योगा, ध्यान, व्यायाम यामध्ये एक शिस्त आणि सातत्य असले पाहिजे. ते अतिशय महत्त्वाचं आहे. काही गोष्टींचा परिणाम व्हायला वेळ लागतो. त्यामुळं तेवढा धीर धरायला पाहिजे आणि सर्व गोष्टी मध्यम प्रमाणात केल्या पाहिजेत. दैनंदिन आयुष्यात मजा सुद्धा केली पाहिजे, पण पुन्हा एकदा आपल्या डाएट आणि व्यायामाच्या शिस्तीकडं वळलं पाहिजे.

तुमच्या फिटनेससाठीच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये आणखी काय बाकी आहे?

नेहमी नवं काहीतरी आजमावत राहिलं पाहिजे. जसं की, मला टेबल टेनिस खेळता येतं, पण टेनिस नव्हतं येत. मी आता टेनिस शिकण्याचा प्रयत्न करतेय. माझी मुलं टेनिस खेळतात. त्यांच्याबरोबर खेळायची संधी मला मिळते.

अशा प्रकारे नवं काहीतरी करत स्वतःच्या शारीरिक क्षमतांना आव्हान देत राहायचं. सर्वांनाच दीर्घायुष्य पाहिजे असतं, पण दीर्घायुष्याबरोबर स्वास्थ्य पण सांभाळलं पाहिजे. मला आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत राहायचं आहे. एक छान आयुष्य मला जगायचं आहे.

वाढत्या वयाबरोबर सौंदर्य आणि त्याचबरोबर कामातील स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही इतर महिलांना काय मंत्र द्याल?

वास्तवदर्शी ध्येय समोर ठेवा. कुणीही परिपूर्ण नसतं. पण, तुम्ही जे ध्येय समोर ठेवलं आहे, ते सातत्यपूर्ण रीतीनं पूर्ण केलं पाहिजे. शिस्तबद्धरीतीनं केलं पाहिजे. त्वचेसाठी मी दोन सूचना करेन. एक म्हणजे आर्द्रता आणि दुसरं उन्हापासून बचाव.

आता प्रदूषण इतकं झालं आहे, ओझोनचा थर कमी होत आहे. त्यामुळं सूर्याच्या किरणांची दाहकता वाढली आहे. त्याचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं रात्री मॉयश्चरायझर आणि सकाळी एसपीएफ (सन प्रोटेक्शन फॅक्टर) नक्की लावा.

पण, तुम्ही काय खाता, कसं राहता यावर तुमचं आयुष्य खूप अवलंबून आहे. तुम्ही हेल्दी फूड खाल्लं, व्यायाम केला, मेडिटेशन केलं तर तुमचा स्टॅमिना आपोआप वाढणार. आता कित्येक महिला नोकरीसाठी, कामासाठी ट्रेनमधून जातात.

त्यामुळं व्यायाम करणं त्यांना शक्य नसतं. पण, तुम्ही जर सोबत एखादं फळ ठेवलं, ड्रायफ्रूट्स ठेवले, तर तुम्हाला इथं- तिथं खाण्याची गरज पडणार नाही. ऑफिसमध्ये आपण सारखं-सारखं चहा प्यायला जातो. त्यापेक्षा तुम्ही लिंबू-पाणी प्या. या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही बदलल्यात तर खूप फरक पडू शकतो.

‘सकाळ स्वास्थ्यम्’ करीत असलेल्या लोकांचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारण्याच्या प्रयत्नांचा समाजाला किती उपयोग होईल, असं आपल्याला वाटतं?

लोकांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी ‘सकाळ स्वास्थ्यम्’ हा छान उपक्रम आहे. कौतुकास्पद आहे. एक ‘हॅपिनेस कोशंट’ असतो. तुम्ही व्यवस्थित, हेल्दी जेवताय, थोडा व्यायाम करताय, थोडं मेडिटेशन करताय, तर आयुष्यात आनंद निर्माण होतो. हॅपिनेस कोशंट चांगला असतो, तेव्हा आपण सर्वच गोष्टी आनंदानं करतो.

सर्व कुटुंब आनंदानं राहतं. त्यातून जो आध्यात्मिक आनंद मिळतो तोही महत्त्वाचा आहे. त्यामुळं तुमची कामंही छान होतात. तुम्ही उत्साहानं कामावर जाता. तुमची उत्पादकता वाढते. त्यामुळं तुम्ही नेहमी कार्यरत राहता.

आपण नेहमी कार्यरत राहिलं, तर आपलं मनही कार्यरत राहतं. मग आपण उगाचच काही विचार करत नाही. या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आपण एक छान उत्पादनक्षम व्यक्ती बनतो, जी सर्व काही करायला तयार आहे. आयुष्यात उत्साह येतो. म्हणून ‘हॅपिनेस कोशंट’ जेव्हा वाढतो, तेव्हा तुमचं आरोग्य ठीक होतं, उत्पादनक्षमता वाढते. त्यामुळं ‘स्वास्थ्यम्’चा हा दृष्टिकोन अद्भुत आहे. याचा लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

तुम्ही ‘सकाळ’च्या व्यासपीठावरून काय सादर करणार आहात?

‘सकाळ’च्या व्यासपीठावरून आम्ही आमचा चित्रपट ‘पंचक’बद्दल बोलणार आहोत. हा चित्रपट ५ जानेवारीला रिलीज होणार आहे. ही कॉमेडी फिल्म आहे. त्यामुळं आपले मित्र-मैत्रिणी, परिवारासोबत तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. त्याबद्दल आणि ‘स्वास्थ्यम्’बद्दल आम्ही बोलणार आहोत. तर लवकरच भेटूया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com