Summer Care : उष्णतेवर मात करण्यासाठी प्या ‘या’ फळांचा ज्यूस, शरीर हायड्रेटेड राहील अन् पोटाला मिळेल थंडावा

Summer Care Fruit Juices : एप्रिल महिन्यातच उष्णतेने उच्चांक गाठल्यामुळे आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Summer Care
Summer Care esakal

Summer Care : सध्या सर्वत्र उकाडा प्रचंड वाढला आहे. या उकाड्यामुळे काही ठिकाणी पाऊस देखील पडला आहे. पावसामुळे वातावरणात जरा थंडावा निर्माण झाला आहे. त्यामुळे, नागरिकांना देखील दिलासा मिळालाय. एप्रिल महिन्यातच उष्णतेने उच्चांक गाठल्यामुळे आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

उष्णतेवर मात करण्यासाठी आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांची मदत घेऊ शकता. भरपूर पाणी पिण्यासोबतच ठराविक फळांचा ज्यूस पिण्यावर भर द्या. यामुळे, पोटाला थंडावा मिळेल आणि शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.

कोल्डड्रिंक्स किंवा पॅकेजिंग केलेले ज्यूस पिण्यापेक्षा ताज्या फळांचा ज्यूस प्या. जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवतील आणि पोटाला थंडावा मिळवून देण्यास मदत करतील. आज आपण अशाच काही फळांच्या ज्यूसबद्दल जाणून घेणार आहोत. जे प्यायल्याने पोटाला थंडावा मिळू शकेल आणि शरीर हायड्रेटेड राहू शकेल.

Summer Care
Home Remedies For Dehydration : डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी 'या' घरगुती उपायांची घ्या मदत, पाण्याची कमतरता होईल दूर

बेरीजचा ज्यूस

बेरीजमध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी इत्यादी बेरीजचे ज्यूस तुम्ही उन्हाळ्यात पिऊ शकता. उन्हाळ्यात या बेरीजचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते.

उन्हाळ्यात या बेरीजचा ज्यूस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. शिवाय, बेरीजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात तुम्ही बेरीजचा ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि पोटाला ही थंडावा मिळतो.

आंब्याचा ज्यूस

उन्हाळा सुरू झाला की, सर्वजण फळांचा राजा असलेल्या आंब्याची आतुरतेने वाट पाहतात. याच सिझनमध्ये आंब्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात होते. या दिवसांमध्ये तुम्ही थेट आंबा कापून खाऊ शकता. यामुळे, शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल आणि पोटाला ही थंडावा मिळू शकेल.

आंबा खाण्यासोबतच अनेकांना मॅंगो शेक किंवा ज्यूस प्यायला आवडतो. उन्हाळ्यात आंब्याचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. यामुळे, शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात. शरीर ऊर्जावान ठेवण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी आंब्याचा ज्यूस प्या.

कलिंगडाचा ज्यूस

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड होय. उन्हाळ्यात कलिंगडाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कलिंगडामध्ये पाण्याचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे, या फळाला 'बॉडी हिलिंग फ्रूट' असे ही म्हटले जाते. उन्हाळ्यात कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि पोटाला थंडावा मिळतो. तुम्ही ज्यूसच्या ऐवजी कलिंगड कापून ही खाऊ शकता. कलिंगडाचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते.

Summer Care
Summer Care: उन्हाळ्यात जीवनशैलीत करा'हे' छोटे-छोटे बदल; एसीशिवायही मिळेल थंडावा.. वाचा सोप्या टिप्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com