Diabetes Patients: कडक उन्हाळा मधुमेहींसाठी ठरू शकतो घातक, 'अशी' घ्या खास काळजी

Diabetes Patients: मधुमेहींनी उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Diabetes Patients:
Diabetes Patients:Sakal

summer care tips effects of heatwave on diabetes patients

कडक उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खुप गरजेचे असते. अन्यथा डिहाड्रेशनमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अतिउष्णता मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे रक्तातील शुगर लेवल वाढू शकते. यामुळे पुढील पद्धतीने आरोग्याची काळजी घेऊ शकता.

  • भरपुर पाणी प्यावे

उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात ६ ते ७ लिटर पाणी प्यावे. तसेच ज्यूस, ताक, फळांचे रस इत्यादींचे सेवन करा. यामुळे डिहायड्रेशन होणार नाही आणि शुगर लेवल वाढणार नाही.

  • योग्य आहार

उन्हाळ्यात जास्त गोड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण यामुळे पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. या दिवसांमध्ये हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा. आहारात हंगामी फळ आणि भाज्यांचा समावेश करू शकता. उन्हाळ्यात कोल्ड डिंक्सचे अतिसेवन टाळावे.

  • शुगर लेवल तपासावी

शरीरातील शुगर लेवल वाढली तर आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे शुगर लेवल नेहमी तपासत राहावी. शुगर लेवल वाढली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Diabetes Patients:
Ice- Cream Cone Recipe: हायजीनची चिंता वाटते? घरीच बनवू शकता कुरकुरीत आईस्क्रीम कोन; मुलं होतील खुश
  • सुर्यकिरणांपासून बचाव

उन्हाळ्यात जास्त सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे मधुमेहींनी उन्हात बाहेर जाताना स्कार्फ किंवा टोपी वापरावी. तसेच सुती कपडे घालावे. डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

  • व्यायाम करावा

मधुमेह असणाऱ्या लोकांनी नियमितपणे व्यायाम करावा. यामुळे उन्हाळ्यात मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करावा. तसेच व्यायाम केल्याने शरीर लवचिक राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com