Summer Diet : बदलत्या वातावरणात 'असा' करा आहारात बदल, राहाल निरोगी

Summer Diet: उन्हाळ्यात आहारात कोणता बदल करावा हे जाणून घेऊया.
Summer Diet Plan
Summer Diet PlanSakal

summer diet plant for kids and older people

उन्हाळ्यात तापमानात लक्षणीय वाढ होते. अशा वातावरणात निरोगी राहण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात हंगामी फळ आणि भाज्यांचा समावेश करावा. यामुळे अनेक आजार दूर राहतात.

  • फळं

उन्हाळ्यात हंगामी फळांचे सेवन करावे. यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते आणि तुम्ही निरोगी राहता. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. यामुळे टरबुज, कलिंगड, काकडी, संत्र, नारळ पाणी प्यावे.

  • डिहायड्राशनची समस्या

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. यामुळे आहारात लस्सी, नारळ पाणी, कोकम शरबत, लिंबू पाणीचे सेवन करावे. उन्हात बाहेर जात असाल तर बॅगमध्ये पाण्याची बाटली सोबत ठेवावी. यामुळे डिहायड्राशनची समस्या होणार नाही.

Summer Diet Plan
Mango Ice Cubes: झटपट तयार होईल कैरीचे सरबत; आधीच 'असे' तयार करून ठेवा 'मँगो आईस क्युब'
  • वयस्कर लोकांसाठी योग्य आहार

वयस्कर लोकांनी आहाराची खास काळजी घ्यावी. उन्हाळ्यात दूध, दही, रायता, ताक, अंडी आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा. तसेच विविध हंगामी फळांचे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. रात्रीच्या जेवणात हलक्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पचनसंस्था देखील निरोगी राहते.

  • तरूण आणि मध्यम वर्गीय लोक

या लोकांनी अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ यासारख्या पदार्थांचे सेवन करू शकतात. यामुळे त्यांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता जाणवणार नाही. याशिवाय पौष्टिक घटकांचा पुरवठा करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करावा. तपकिरी तांदूळ, गहू आणि ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारखी इतर धान्यांमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वांसाठी त्यांच्या आहारात समाविष्ट करणे सर्वात महत्वाचे आहे.

उन्हाळ्यात थंड दूध, ताक, लस्सी यासारख्या पदार्थांचा समावेश करावा. काम असेल तरच घराबाहेर जावे. उन्हाळ्यात लहान मुलांना आणि वयस्कर लोकांमध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे भरपुर पाणी आणि रसाळ फळांचा आहारात समावेश करावा.

  • कोणते पदार्थ खाणे टाळावे

उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

तेलकट,शिळे पदार्थ खाणे टाळावे.

पॅकेजिंग पदार्थ खाणे टाळावे.

डिहाड्रेशनपासून बचाव करण्यासाठी चहा, कॉफी, यासारख्या पदार्थांचे सेवन करावे.

अशाप्रकारे तुम्ही उन्हाळ्यात निरोगी राहू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com