सावधान! उन्हाळ्यात Cold Water पिणं पडू शकतं महागात, आजच बदला सवय

उन्हाळ्यात Summer गार पाणी प्यायल्याने आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्य़ामुळे जर तुम्हालाही उन्हाळ्यात थंड गार पाणी प्यायची सवय असेल तर आधी त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या
उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याची सवय बदला
उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याची सवय बदलाEsakal

एकीकडे उन्हाच्या झळा आणि दुसरीकडे शरीरातून निघणारा घाम यामुळे उन्हाळा अगदी नकोसा वाटतो. अंगाची लाही लागी होत असताना घशाची कोरड भागवण्यासाठी थंड पाणी दिलासा देणारं ठरतं.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये Summer Season गरमीने बेहाल झालेलं असताना सतत गार पाणी Cold Water पित रहावसं वाटतं. बाहेरून तळपत्या उन्हातून घरी पाऊल ठेवताच आपण आधी गार पाण्यचा ग्लास हातात घेतो आणि तहान भागवतो. Summer Marathi Health Tips side effects of Drinking Cold Water

पोटाला गार वाटणारं हे पाणी Cold Water पिऊन समाधान वाटत असलं तरी तुम्हाला ठाऊक आहे का की उन्हाळ्यात Summer गार पाणी प्यायल्याने आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्य़ामुळे जर तुम्हालाही उन्हाळ्यात थंड गार पाणी प्यायची सवय असेल तर आधी त्याचे दुष्परिणाम जाणून  घ्या.

हृदयाच्या कार्यावर परिणाम- थंड पाण्याचा तुमच्या हृदयाच्या गतीवर खूप गंभीर परिणाम होते. थंड पाण्यामुळे आपल्या शरीराचीस मज्जसंस्थेचं संतुल बिघडतं त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती मंदावते.

एका अभ्यासानुसार फ्रिजमधलं थंड पाणी जास्त प्यायल्याने दहावी क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) स्टिम्युलेट म्हणजेच उत्तेजित होते. थंड पाण्याता परिणाम थेट या नर्व्हवर होत असल्याने त्याचा परिणाम हार्ट रेटवर होतो.

सर्दी खोकला होण्याची शक्यता- उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने सर्दी- खोकला होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जेवल्यानंतर थंड पाणी पिण्याऐवजी साधं पाणी प्या. वास्तविक थंड पाण्यामुळे आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात म्युकस निर्माण होते आणि शरीरात संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

शरीरात श्लेष्मल वाढल्यामुळे श्वासोच्छवासाचा मार्ग बंद होतो. त्यामुळे घसा खवखवणे, कफ, सर्दी आणि घशाला सूज येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

पचन क्रियेवर परिणाम- सतत थंज पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम आपल्या रक्त पेशींवर होतो. याचा थेट परिणाम आपल्या पचनावर होते. यामुळे पचनक्रिया मंदावते. पोटात थंड पाणी गेल्याने अपचनाचा त्रास होतो. एका संशोधनानुसार थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळेही पचनाची समस्या निर्माण होते.

हे देखिल वाचा-

उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याची सवय बदला
प्रवासात तुमच्या बाटलीतील पाणी थंड ठेवेल हा कूलर

बद्धकोष्ठता- बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी थंड पाणी पिणं टाळावं. अन्यथा हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही जेवताना गार पाणी पिता तेव्हा ते जेवण थंड आणि अधिक कडक होवू शकतं.

तसंच आतड्यांचंही आकुंचन होतं आणि हे बद्धकोष्ठतेचं एक महत्वाचं कारणं आहे. त्यामुळे जास्त गार किंवा जास्त गरम पाणी पिणं टाळावं.

घशात इंफेक्शन होण्याचा धोका- उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही उन्हातून तहानलेले येता तेव्हा अनेकदा तहान भागवण्यासाठी चिल्ड म्हणजेच अति थंड पाणी अगदी जलद पिता यामुळे घशाला इजा होवू शकते. तसचं घशाला इंफेक्शन होवून घसा खवखवू शकतो. तसचं घशाला सूज येऊ शकते. 

वजन कमी करण्यात अडचण- जे लोक वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी थंड पाण्याचं सेवन टाळावं. थंड पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट्स बर्न होण्यास अडचण निर्माण होते.

फ्रिजमधील पाण्याने शरीरातील चरबी अधिकच कडक होवू लागते त्यामुळे ही चरबी वितरण्यास अडचणी निर्माण होवून वजन कमी होत नाही.

पोषण मुल्यांवर परिणाम- सामान्यत: शरीराचं तापमान ३७ अशं सेल्सियस असतं. गार पाणी प्यायल्यानंतर तुमच्या शरीराला तापमान नियंत्रित करणायासाठी ऊर्जा खर्च करावी लागते.

म्हणजेच पचनासाठी तसचं पोषण मूल्य शोषून घेण्यासाठी लागणारी ऊर्जा ही तापमान नियंत्रणासाठी खर्च होते. त्यामुळेच शरीराला पुरेश्या पोषण मूल्यांचा पुरवठा होत नाही. 

डोकेदुखी- उन्हातून आल्यानंतर जर लगेचच खूप थंड किंवा बर्फाचं पाणी प्यायल्याने मेंदू फ्रिज होण्याची शक्यता असते. थंड पाणी प्यायल्याने तुमच्या मणक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी सुरु होवू शकते.

सायनसचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या समस्या यामुळे आणखी वाढू शकतात. त्यामुळेत सायनसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे.

यासाठीच उन्हाळ्यात थंडगार पाणी पिणं टाळलं पाहिजे. फ्रिजच्या पाण्याला पर्याय म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही मातीच्या भांड्याचा म्हणजेच माठाचा वापर करू शकता. माठातील गार पाणी प्यायल्याने शरीराला कोणताही त्रास होत नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com