Superstition Vs. Science : डोळे फडफडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगते विज्ञान...

बऱ्याचदा डोळा फडफडणे शुभ अन् अशुभ समजले जाते. पण असे का होते याचं कारण समजून घेऊया.
Superstition Vs. Science
Superstition Vs. Scienceesakal

Eyes Flutter Scientific Reason : बऱ्याचदा आपला डावा किंवा उजवा डोळा फडफडतो. पूर्वापार त्या मागे काही शुभ, अशुभाचे संकेत लावले गेले आहेत. पुरुषांचा अमुक डोळा फडकला तर अशुभ असतं तर स्त्रियांचा तमुक डोळा फडकला तर अशुभ होतं असं समजलं जातं. पण खरंच डोळे का फडफडतात? कधी कधी पापणी ऐवजी फक्त भिवई फडफडते. कधी कधी शरीराच्या दुसऱ्याच एखाद्या भागातली एखादी नस तडतडत असते. यामागे शुभ-अशुभ हिच कारणं असतात की अजून काही जाणून घेऊया.

कोरडे डोळे - काहीवेळा डोळ्यांतला कोरडेपणा हा त्यांच्या फडफडण्या मागचे कारण असू शकते. त्यामुळे डोळ्यांना योग्य तेवढा आराम देत रिलॅक्स करायला हवे. स्क्रिनकडे सतत बघून डोळे कोरडे होतात.

पुरेशी झोप नसणे - बऱ्याचदा पुरेशी झोप न मिळाल्यानेही ही समस्या होत असल्याचे दिसून येते. डोळे थकतात. रात्री उशीरापर्यंत जागरण यामुळे त्यांच्यावर ताण येऊ शकतो.

Superstition Vs. Science
Health News : 10 पैकी 4 रूग्ण डोळ्यांच्या विकाराचे; वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना त्रास

स्नायू समस्या - जर तुमचे डोळे सारखेच फडफडत असतील तर डोळ्यांच्या स्नायू संबंधी समस्या असण्याची शक्यता असू शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे.

तणाव - काही वेळा जर तुम्ही जास्त ताणातून जात असाल तर तो ताण तुमच्या स्नायूंवर येऊन डोळे फडफडू शकतात.

मॅग्नेशियमची कमी - मॅग्नेशियमची कमतरता हे देखील डोळे फडफडण्या मागचे एक कारण असू शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com