Sweet Eating : सणासुदीला गोड खाताय? जरा जपूनच खा

उत्सवकाळात आवडीचे पदार्थ दिवसातून अनेक वेळा आपण खात असतो. गणेशोत्सवापाठोपाठ येणाऱ्या दसरा-दिवाळीतही आपण पदार्थांवर ताव मारतो.
Liver
LiverSakal

पिंपरी - उत्सवकाळात आवडीचे पदार्थ दिवसातून अनेक वेळा आपण खात असतो. गणेशोत्सवापाठोपाठ येणाऱ्या दसरा-दिवाळीतही आपण पदार्थांवर ताव मारतो. याचा थेट परिणाम यकृतावर होण्याची शक्यता असते. अशा वेळी आपला आहार आणि जीवनशैली याचा ताळमेळ ठेवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

सणवार सुरू झाले की गोडधोड आणि चमचमीत पदार्थांची रेलचेल असते. आजकाल गोड पदार्थांची सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्यामुळे आपल्याकडून साहजिकच त्यांचे जास्त प्रमाणात सेवन होते. अशा वेळी आपले सण आपली जीवनशैली यांचा ताळमेळ घालता आला पाहिजे, असेही तज्ज्ञांनी आवर्जून नमूद केले.

काय करावे?

बिनसाखरेची आणि नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेली मिठाई केव्हाही सरस पर्याय ठरते. मात्र ती सुद्धा सारखी-सारखी खाऊ नये. दुधाच्या आणि मैद्याच्या पदार्थांपेक्षा, तृणधान्यापासून बनवलेली पक्वान्ने तर अगदी उत्तमच ठरतात.

परिणाम कसा होतो?

यकृत हा मूकपणे कार्य करणारा संरक्षक अवयव आहे. म्हणून त्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. हृदय, मेंदू, मूत्रपिंड या अवयवांप्रमाणेच यकृत महत्त्वाचे असते. बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताच्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. यात सगळ्यात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘फॅटी लिव्हर,‘ अशी माहिती डीपीयू स्पेशालिटी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अमोल डहाळे यांनी दिली.

कशामुळे ‘फॅटी लिव्हर’ होते?

‘फॅटी लिव्हर'' हा फक्त तेलकट, तुपकट पदार्थ खाल्यामुळे होतो हे अर्धसत्य आहे. जास्त उष्मांक असलेले पदार्थ खाणे हे फॅटी लिव्हरचे सर्वात मुख्य कारण आहे. मानवी शरीरात सर्व प्रकारचे उष्मांक शेवटी चरबीमध्ये परिवर्तित केले जातात. कमी जागेत जास्त साठा करता येत असल्यामुळे याच स्वरूपात चरबी साठते. प्रमाणाच्या पलीकडे ती शरीराला आणि यकृताला इजा करते, असेही त्यांनी सांगितले.

यकृताचे कार्य

सर्वसाधारणपणे शरीरातील चरबी यकृतामधून कार्यान्वित होते, मात्र फक्त पाच टक्के चरबी यकृतामध्ये साठवून ठेवली जाते. यापेक्षा जास्त चरबी साठल्यास त्याला 'फॅटी लिव्हर' म्हणतात. ही या आजाराची सुरवात असते. जस-जसे प्रमाण प्रमाण वाढत जाते, तसे यकृताला इजा होण्यास सुरवात होते. पुढील टप्प्यांमध्ये गुंतागुंत वाढत जाते. ‘फायब्रोसिस'' आणि त्यानंतर यकृताचे कायमचे थांबते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीकडे विशेषतः खाण्याकडे प्रकर्षाने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com