Women's Health: वयाच्या पस्तिशीनंतर प्रत्येक महिलेने करायलाच हव्यात 'या' चाचण्या; कॅन्सर आणि इतर आजारांचा धोका होईल कमी

वयाच्या ३५ वर्षांनंतर प्रत्येक महिलेने काही विशेष वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून कोणताही गंभीर आजार वेळेत ओळखता येईल आणि त्यावर उपचार करणे शक्य होईल.
Womens Health
Womens HealthSakal

माणसाचं वय जसजसं वाढतं तसतसं त्याच्या शरीरातील गुंतागुंत वाढत जाते. जसजसे वय वाढते तसतसे शरीर अशक्त होते आणि अनेक आजारांचा धोका निर्माण होऊ लागतो. वयाच्या ३५ वर्षानंतर महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत विशेषतः जागरूक असलं पाहिजे, कारण या वयानंतर त्यांच्या शरीरात कर्करोग आणि इतर अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे वयाच्या ३५ वर्षांनंतर प्रत्येक महिलेने काही विशेष वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून कोणताही गंभीर आजार वेळेत ओळखता येईल आणि त्यावर उपचार करणे शक्य होईल, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. ३५ वर्षांनंतर महिलांनी कोणत्या चाचण्या (अनुवांशिक तपासणी आणि चाचण्या) केल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

Womens Health
Woman Health : बाळंतपणात वाढतं वजन? ऐश्वर्या ते आलिया, हे पदार्थ खात कमी केलं वजन

अनुवांशिक तपासणी

ही एक वैद्यकीय चाचणी आहे ज्यामध्ये स्त्रीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अनुवांशिक रोगाची चिन्हे आणि धोका ओळखता येतो. या चाचणीद्वारे कुटुंबातील कोणाला कोणताही आजार आहे की नाही आणि त्याचा परिणाम महिलेवर होईल की नाही हे कळू शकतं. या चाचणीद्वारे महिला अनेक गंभीर अनुवांशिक आजारांपासून स्वतःचं संरक्षण करू शकतात. अनुवांशिक चाचण्यांद्वारे स्त्रियांना होणार्‍या कोणत्याही प्रकारचा कर्करोगही ओळखता येतो.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य

वाढत्या वयाबरोबर हृदय कमकुवत होत जातं आणि म्हणूनच स्त्रियांनी जनुकीय चाचणी करून हृदयाशी संबंधित चाचण्या करून घ्याव्यात. याद्वारे, हायपरकोलेस्टेरोलेमिया आणि हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी यांसारखे आनुवंशिक रोग शोधले जाऊ शकतात.

Womens Health
Women's Mental Health : महिलांमध्येच होतात जास्त मूड स्वींग; हे पदार्थ खा आणि मूडला ठिक करा!

अल्झायमर

वयाच्या पस्तिशीनंतर, महिलांनी अल्झायमरसाठीही चाचणी केली पाहिजे. या आजाराचे कारण शरीरातील APOE जनुक आहे आणि त्यामुळे जनुकीय चाचणीतही त्याची चाचणी केली जाते. यामुळे ती महिला अल्झायमरची शिकार होणार आहे की नाही हे कळू शकेल.

गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग

३५ वर्षांनंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करणंही आवश्यक मानलं जातं. या स्क्रीनिंगमध्ये, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी केली जाते आणि त्यासोबत एचपीपी जीनोटाइपिंग चाचणीही केली जाते. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण जगभरात वेगानं वाढलं आहे आणि भारतात हे प्रमाण वेगाने पसरत आहेत.

Womens Health
Women Health : महिलांनी या पद्धतीने पुदिन्याचे सेवन केल्यास हॉर्मोनल अंसतुलनाची समस्या होईल दूर

स्तनाचा कर्करोग

ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता दूर करण्यासाठी ३५ वर्षांनंतर बीआरसीए जनुक उत्परिवर्तन चाचणी आवश्यक असल्याचंही सांगितलं जातं. स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी BCRA जनुकाची अनुवांशिक तपासणी चाचणी करावी.

टीप - या लेखात नमूद केलेल्या सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com