- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
मी आज अशा विषयावर लेख लिहितो आहे ज्याबद्दल अतिशय सहज आणि विनोदाने चर्चा केली जाते किंवा हा विषय हसण्यावारी नेला जातो. परंतु खरंतर आपण या विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सर्वसाधारणपणे असे दिसते आहे, की जे लोक फिट असतात ते फिट नसणाऱ्या लोकांपेक्षा जास्त अल्कोहोलचे सेवन करतात.